शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: कोरोना साथीच्या आजारांमुळे देशभरात हाहाकार माजलेला आहे. उद्योग-व्यापार एवढेच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मुलांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. हे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी पुन्हा शाळा सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. आणि सध्या तरी लसीकरण हा एकमेव मार्ग आपल्याकडे आहे. असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था चे प्रमुख डॉ. रणजीत गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. गुलेरिया सरांनी सांगितले की, मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध झाल्यास, ही खूप मोठी कामगिरी असेल. त्यामुळे शाळा उघडण्याचा आणि अन्य शैक्षणिक कार्य करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. भारत आणि बायोटेक यांच्या लस तिसऱ्या टप्प्यातील वय वर्ष १७ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी सप्टेंबर पर्यंत लसी उपलब्ध होऊ शकतात. औषध नियामककांच्या मंजुरीनंतर अशा परिस्थितीत भारतात लसी उपलब्ध होऊ शकतील. त्यापूर्वी फायझरची लस मंजूर झाली तर, हा सुद्धा एक पर्याय मुलांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
ते पुढे म्हणाले की जर जाई झायडासची लस मंजूर झाल्यास ते आणखी पर्याय म्हणून फायदेशीर ठरेल. ते म्हणाले मुलांमध्ये कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असून काहींमध्ये मात्र लक्षणेही दिसत नाहीत. असे असून सुद्धा अद्याप कोरोना विषाणू संसर्ग पसरवू शकतात अलीकडे सरकारने इशारा दिला आहे की कोरोनाव्हायरस मध्यापर्यंत मुलांवर फारसा परिणाम केलेला नाही नाही परंतु विषाणू मध्ये काही बदल झाल्यास किंवा साथीच्या रोगाचा बदल घडून आल्यास मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू ठेवणे हा पर्याय असेल.