Site icon ज्ञानसंवाद

NPS योजने संदर्भातील विविध प्रश्नांचे अचूक उत्तरे

राज्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू करण्यात आली होती. सदर योजना शासन निर्णय क्र. अंनियो ३४१५/प्र.क्र. २७६/ टिएनटी-६ दि. १९/०९/२०१९ अन्वयें केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत असणारे सर्व कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर योजनेची प्रत्यक्ष अमंलबजावणी माहे मार्च २०२१ पासून करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य होणे करीता कायम निवृत्ती वेतन खाते क्रमांक (PRAN) घेणे करीता ऑनलाईन CSRF फॉर्म भरण्याची सुविधा शालार्थ प्रणालीत करण्यात आली आहे.

NPS योजना अंमबजावणी बाबत- मा.शिक्षण संचालक यांचे पत्र
दिनांक- 30/06/2021,डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Exit mobile version