Site icon ज्ञानसंवाद

कुटुंब सर्व्हेक्षणाने झाली शिक्षण सेतू अभियानाची सुरूवात …!


(आदिनाथ सुतार ,अहमदनगर )

अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई हरिश्चद्रगड अभयारण्य क्षेत्रातील चाळीसगांव डांगन परिसरात अतिदुर्गम गावे आहेत. येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्याचे शिक्षण कोरोना काळात सुरू रहावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा माफ॔त आश्रमशाळा विद्यार्थ्यासाठी शिक्षण सेतु अभियान राबिविण्यात येत आहे.नगर जिल्ह्यातील राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत शेंडी, मवेशी, केळीरुम्हणवाडी, केळीकोतुळ, जवळेबाळेश्वर, पिंपरकणे, अकलापूर व राहूरी या केंद्रस्थरावरून या अभियनाची अंमलबजावणी होत आहे. येथील काही केंद्रअंतग॔त अनेक दुग॔म आदिवासी गावे असून त्यामुळे विद्यार्थ्यांसी व पालकांसी संपक॔ साधतांना शिक्षकांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत खुप मोठी कसरत करावी लागली आहे.
सर्वच केंद्रातील अभियानाचे उदघाटन मंगळवार दि. 19/6/2021 रोजी विविध केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी सर्व श्री.सुरेश राठोड, माधव शेळके,कैलास नवले, अंबादास बागुल, नानासाहेब झरेकर,मिलींद गुंजाळ, पंडित कदम, नितीन पायके व नवनाथ गायकवाड, यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.प्रस्तुत अभियान उदघाटन प्रसंगी विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिक्षण सेतु अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 628 गावातील 9634 शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 360 शिक्षकांकरवी कुटुंब सर्व्हे पुर्ण केला असून या सर्व्हे व्दारे शिक्षण, व्यवसाय रोजगाराचे स्वरूप, पालकांचे रोजगारासाठी स्थलांतर, स्मार्टफोन, स्टेशनरी साहित्य, कोविड लसीकरण, घरातील मुलांची एकुण संख्या, मुले कोणत्या शाळेत शिकतात, आदिवासींसाठी असणार्या कोणत्या योजनेचा व कोणत्या विभागामार्फत लाभ मिळाला आहे, नेटवक॔ व इतर सूक्ष्म गोष्टींची माहिती संकलीत करण्यात आली असून शैक्षणिक अभ्यासाव्यतिरीक्त पालकांचे जीवनमान उंचवण्यासाठी देखील या शिक्षण सेतु अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेतील माहितीचा उपयोग आदिवासी विकास विभागा माफ॔त विविध योजनांच्या लाभार्थी शोधणेसाठी केला जाणार आहे. राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. संतोष ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यातील हे अभियान उत्साहात सुरू झाले असून यात,क्रमिक पुस्तके वाटप, शिक्षकांनीच तयार केलेल्या अभ्यासक्रम पुव॔ तयारीसाठी स्वाध्यायपुस्तिकेव्दारे व इतर स्वयंनिर्मित शैक्षणिक साहित्यव्दारे गृहभेटीतून मुलांचे शिक्षण सुरू झाले आहे.प्रथमतः कोरोना लसीकरण विषयी आश्रमशाळा विद्यार्थी व पालकांची जागृती केली जात असून आदिवासी ग्रामस्थ व पालकांच्या मनातील कोविड विषयी भिती कमी करून जास्तीत जास्त लसीकरण करणे विषयी प्रचार करून लस घेणेस ग्रामस्थांना प्रवृत्त केले जात आहे. तसेच विविध अभ्यासपुरक शैक्षणिक साहित्य निर्माण करून मुलांना क्रमिक अभ्यासक्रमाकडे नेले जात असून नियमित शाळा सुरू होईपर्यंत दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व आश्रमशाळा शिक्षकांनी कंबर कसली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून नेटवक॔ नसलेल्या या सह्याद्रीच्या दर्याखोर्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांनीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याक्षरे गिरवण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळातील या ज्ञानयज्ञासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभाग आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असून गेल्या सवा वर्षाच्या कालखंडात कुठे ऑनलाईन तर जेथे नेटवक॔ नाही तेथे प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे सुरू असणार्या शिक्षण प्रकल्पात यावर्षी अमुलाग्र बदल केला असून उपलब्ध सर्वच तंत्राचा वापर आश्रमशाळा शिक्षण सेतु अभियानत केला जाणार आहे .

Exit mobile version