Site icon ज्ञानसंवाद

हिवरेबाजार गावात झाली प्रत्यक्ष शाळा सुरू. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामसभेचा निर्णय; गाव पूर्णता कोरोनामुक्त झाल्याने घेतला निर्णय

शशिकांत इंगळे,

वार्ताहर: राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र हिवरेबाजार गावच्या ग्रामसभेने शाळा सुरू करण्याचा एक अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावी चे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे सुरू केले आहेत. आणि इयत्ता पहिली पासून चे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे. हिवरेबाजार गावात शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु शासनाची शाळा बंद बाबत धोरण निश्चित असल्याने अधिकाऱ्यांनी कोणतीही जोखीम स्वीकारली नाही. म्हणून हिवरेबाजार ग्रामसभेमध्ये शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी यांचा समन्वय साधून शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आणि शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करणे बाबत पालकांचा बऱ्याच काळापासून आग्रह होता. त्यामुळे पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठवण्याची सुद्धा लिखित आश्वासन देण्यास तयार होते. या कारणाने हिवरेबाजारचे उपसरपंच व राज्य आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले.
शाळेतील मुले आजारी असतील किंवा घरातील कोणी आजारी असेल अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवू नका. असे सुद्धा आव्हान करण्यात आले आहेत.
पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२ तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी आहेत आणि शाळेमध्ये शंभर टक्के उपस्थिती दिसून येत आहे.

Exit mobile version