जळगाव हंसिका महाले व रायगडची श्रावणी गोरेगावकर यांचे यश..
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शाळा फाउंडेशन बार्शी यांनी आयोजित केलेल्या कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती संयोजक श्री प्रतापसिंह मोहिते यांनी दिली.
इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात जळगावची हंसिका नरेंद्र महाले ही प्रथम विजेती ठरली. द्वितीय- श्रद्धा सचिन खोत (कोल्हापूर ), तृतीय-समृद्धी संदीप कारखेले (रायगड ),उत्तेजनार्थ -मफिरा अमीर मुलाणी( सोलापूर ) व प्रियदर्शनी दिलीप हाके (सांगली) विजेते ठरले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात रायगडची श्रावणी सुनील गोरेगावकर प्रथम विजेती ठरली.द्वितीय- वैष्णवी वसंत कंक (पुणे ) ,तृतीय- समृद्धी संजय भोसले(सोलापूर),उत्तेजनार्थ-शरयुक्ता शरद येडके(सोलापूर),वेदांत रमेश ठाणगे (अहमदनगर ) हे स्पर्धेत विजेते ठरले.
कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व राजमाता जिजाऊंचे संस्कार हे समाजापुढे भाषणाच्या माध्यमातून येण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकूण 742 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व स्पर्धकांची भाषणे राज्यभरातून व देशभरातून दीड लाख लोकांनी शाळा फाउंडेशन या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पाहिली असल्याची माहिती त्यांनी दिली.सर्व विजेत्या स्पर्धकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने व त्यांचे नेतृत्व व वक्तृत्व कौशल्य ऑनलाइनच्या माध्यमातून समाजापुढे आणण्यासाठी शाळा फाऊंडेशनने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता.विद्यार्थी हिताचे नवनवीन प्रयोग,उपक्रम,विविध स्पर्धा यापुढील काळातही संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा मानस आहे.
—-श्री प्रतापसिंह मोहिते,संयोजक, शाळा फाऊंडेशन,बार्शी जि- सोलापूर