Site icon ज्ञानसंवाद

आता घरबसल्या करा आपल्या बँक खात्याला वारसदाराची नोंदणी (Nominee Registration). भारतीय स्टेट बँक (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी केली ही सुविधा उपलब्ध.

सतीश लाडस्कर,भंडारा

वारसदार नोंदणीची (Nominee Registration)ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँक खात्याच्या वारसदाराची नाव नोंदणी करता येणार आहे.

★ वारसदाराचं नामनिर्देशन करण्याची गरज काय?

बँकेत खते उघडताना वारसदाराचे नामनिर्देशन करणे फार आवश्यक असते. जर बँक खातेदाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, आणि त्या खातेधारकाने वारसदाराचे नामनिर्देशन केले नसेल तर त्या खात्यातिल रक्कम बँकेकडे जमा असते. सदर खातेदाराच्या कुटुंबातील सदस्यांना ती रक्कम सहजासहजी मिळवता येते नाही. याउलट जर बँक खात्याला वारसदाराचे नामनिर्देशन केले असल्यास संबंधित वारसदाराचा खात्यात असलेल्या रकमेवर पूर्ण हक्क असतो. त्यासाठी प्रत्येक खातेदाराने आपल्या बँक खात्याला वारसदाराचे नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

वारसदाराचे नामनिर्देशन करण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकांना यापूर्वी बँकेच्या शाखेत हेलपाटे मारावे लागत होते. आता मात्र, स्टेट बँकेने ही सुविधा ऑनलाईन सुरू केली आहे. SBI ने केलेल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या ऑनलाईन एसबीआय (Online SBI) किंवा योनो लाइट (YONO Lite) अ‌ॅपचा वापर करुन वारसदारांची माहिती भरता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया मधील सर्वच प्रकारच्या खात्यांकरिता ही सुविधा उपलब्ध आहे.बचत किंवा चालू खाते ,मुदत किंवा रिकरिंग ठेव खाते असेल तर नॉमिनी म्हणजेच वारसादाराची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

ऑनलाईन वारसदाराचे नामनिर्देशन करण्याच्या दोन पद्धती आहेत.

1) YONO LITE अ‍ॅपद्वारे.

2) onlinesbi. com या साईट वरून.

👇खालील स्टेप follow करा व दोन्ही पध्दतीने नामनिर्देशन कसे करावे हे जाणून घ्या.

1) YONO LITE अ‍ॅप वापरकर्त्यांनी खलील स्टेप्स वापरा.

◆ सर्वप्रथम YONO LITE App वर लॉग इन करा.

◆ अ‌ॅप ओपन झाल्यावर मुख्यपृष्ठ (Home Page) बटणावर क्लिक करा.

◆ आता सेवा विनंती (Service Request) हा पर्याय निवडा.

◆ त्यानंतर ऑनलाइन नामनिर्देशन म्हणजेच (Nominee Registration) चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

◆ आता आपल्या बँक खात्याचा तपशील निवडावा आणि विचारलेली पूर्ण माहिती भरावी.

◆ त्यांनंतर नॉमिनीची म्हणजेच वारसदाराची संपूर्ण माहिती भरा.
जर आधी एखाद्या व्यक्तीची वारसदार म्हणून नोंद असेल तर नको असल्यास ती रद्द करावी. वारसदाराशी असलेलं नातं लिहावं.

2) onlinesbi.com या साईटवरून नेट बँकिंगद्वारे नामनिर्देशन करणे.

● सर्वप्रथम onlinesbi.com या वेबसाईटवर भेट द्या.

● आता विनंती आणि चौकशी (Request and Inquiry) या ऑप्शनवर क्लिक करा.

● त्यानंतर दिलेल्या पर्यायांपैकी ऑनलाइन नामनिर्देश (Online Nomination) हा पर्याय निवडा.

● आता आपल्या खात्याचा प्रकार निवडा.

● आता आपल्या वारसदाराची माहिती योग्य प्रकारे भरून अपडेट करा.

● माहिती भरल्यानंतर ती Verify करुन ती अपडेट केली जाईल.

  अशाप्रकारे आपल्या बँक खात्याला वारसदाराचे नामनिर्देशन (Nomination) केले जाईल.

Exit mobile version