शशिकांत इंगळे, अकोला
वार्ताहर: केंद्र सरकारने कोरोना महामारीमध्ये पीएफ खात्यातून ॲडव्हान्स सुविधा सुरू केली आहे. पीएफ खातेधारक त्यांच्या खात्यात जमा झालेल्या ७५% रकमेपैकी किंवा तीन महिने जमा झालेल्या मूळ वेतन किंवा महागाई भत्ता यापेक्षा जे कमी असेल ती रक्कम काढता येते. ePF ने या माध्यमातून बेरोजगारांना मदत करणे आणि सोबतच त्यांचे सदस्यत्व सुरू ठेवणे बाबत निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सुद्धा COVID-१९ ऍडव्हान्स सुविधेचा लाभ दिला गेला होता. त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांना रुपये १५००० पेक्षा पगार कमी आहे अशा ७६.३१ लाख धारकांनी लाभ घेतला होता. त्यांनी covid-१९ नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स रक्कम काढलेली होती. त्या सुविधाअंतर्गत त्यावेळेस १८६९८.१५ कोटी रुपये काढण्यात आले होते. या महामारीच्या काळामध्ये पीएफ खातेधारकांना पैसे मिळवण्यासाठी केलेल्या क्लेमची तातडीने पडताळणी करून ती मंजूर केली जात आहे. यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये क्लेम करणाऱ्या खाते धारकांच्या खात्यात तीन दिवसात पैसे जमा केले जात आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ईपीएफ खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही त्यांना लवकर करून घ्यावे लागेल. अन्यथा पीएफ खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. खात्याशी आधार लिंक नसेल तर ईसीआर देखील दाखल करता येणार नाही.