Site icon ज्ञानसंवाद

जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ३० जून नंतर सुरू करणार; ग्राम विकास मंत्री मा.हसन मुश्रीफ

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहार: कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल संदर्भात शिष्टमंडळाने ग्राम विकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ३० जून नंतर सुरू करणार असल्याची ग्वाही दिली. अशी माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.शासन निर्णय- 7 एप्रिल 2021


राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात याबाबत शासनाने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी शिक्षक बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले होते. त्या संदर्भातील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. बदली धोरणानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या ३१ मे पर्यंत होणे बंधनकारक आहेत. परंतु यावर्षी कोरोना महामारी मुळे ३० जून पर्यंत कोणत्याही प्रकारच्या बदल्या करू नये. असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची गैरसोय व निराशा झालेली दिसून येत आहे. परंतु आज रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकची प्रक्रिया राज्यात सुरु झालेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरू करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी. बदलीसाठीची सेवेची अंतिम दिनांक ३१ मे ऐवजी ३० जून करावी. संवर्ग ४ मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजण्यात यावे. या संदर्भात शासनाने लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) यांच्यावतीने करण्यात आलेली आहे. याबाबत लवकरच शुद्धिपत्रक काढू असे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिले आहे. ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख बदलीसाठी सेवेची अंतिम तारीख धरल्यास २०१८ व २०१९ मध्ये विस्थापित होऊन परतालुक्‍यात बदलून गेलेल्या शिक्षकांना स्वतालुक्यात येण्यासाठी सोय उपलब्ध होऊन एका शाळेत ३ वर्षे पूर्ण करणाऱ्या संवर्गातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळेल.

–केशवराव जाधव, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय वाचा- 👇👇

https://dnyansanvad.com/?p=2932

Exit mobile version