Site icon ज्ञानसंवाद

…या परिस्थितीत काढता येणार पीएफ खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम,अवघ्या काही तासाभरात.

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: कोरोना महामारीच्या काळात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहेत. अशा संकटात नोकरदारांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) मध्ये जमा असलेल्या रकमेचा आधार मिळाल्यामुळे ईपीएफ खाते हे फार उपयुक्त ठरले आहे. नोकरदार वर्ग केवळ या खात्यात गुंतवणूकच नाही तर आवश्यक असलेली रक्कम काढून सुद्धा घेऊ शकतो. पूर्वी ईपीएफओ कडून मुलाचे लग्न, मुलींचे लग्न, शिक्षण किंवा मेडिकलसाठी खात्यातून पैसे काढण्याचा महत्त्वाचा पर्याय दिला होता. परंतु आता ईपीएफओ कडून अनेक कारणांसाठी रक्कम काढली जाऊ शकते. आता ईपीएफओने खातेदारांना एक नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आता कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सदस्यांना त्वरित १ लाख रुपयाचे आगाऊ रक्कम मिळवता काढता येणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही गॅरेंटीची अर्थात हमीची आवश्यकता लागणार नाही. ईपीएफओने १ जून रोजी या संदर्भात परिपत्रक पब्लिष केले आहे. या परिपत्रकात सांगितले आहे की, Covid-19 सारख्या इतर कुठलाही गंभीर आजार झाल्यास म्हणजे जीवाचा धोका निर्माण झाल्यास अशा आजारांसाठी पगारदार व्यक्तींना १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल ऍडव्हान्स स्वरूपात दिली जाऊ शकणार आहे.

मेडिकल ऍडव्हान्स रक्कम कोणाला घेता येईल?

याआधी ईपीएफओने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी ईपीएफ खात्यातून रक्कम घेणे बाबत परवानगी दिली होती. परंतु सदरील रक्कम केवळ वैद्यकीय खर्चाच्या अंदाजे किंवा वैद्यकीय बिल भरण्यासाठी होती. आता ईपीएफओने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत १ लाख रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी खातेदाराला कोणत्याही बिल किंवा अंदाजे खर्च सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जदाराला फक्त एका अर्जाद्वारे १ लाख रुपये मिळू शकतील. आणि जर रुग्णालयात दाखल झाले असेल तर कुणालाही हे काम करता येईल.

खात्यातील रक्कम किती दिवसात मिळू शकेल?

पीएफ खाते असलेली व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोणताही सदस्य किंवा कुटुंबाच्या वतीने अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर काही तासातच पैसे मिळू शकतील. जर आठवड्यातील कुठल्याही कामकाजाचा दिवस असेल. तर त्याच दिवशी रुग्णालयाच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे मिळतील. खरं पाहता कोणत्याही परिस्थितीमुळे रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास हा पैसा खूप उपयुक्त ठरणार आहे. हा निर्णय कोविड ॲडव्हान्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. असा निर्णय गेल्या महिन्यात ईपीएफओ बोर्डाने मंजूर केला आहे.

तुम्हालाही रक्कम कशी मिळेल?

ज्या रकमेसाठी खातेदारास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. १ लाख रुपये ऍडव्हान्स रकमेवर दाबा करण्यासाठी खातेदारास सरकारी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजने अंतर्गत असलेल्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असेल. खासगी रुग्णालयात दाखल केलेले असल्यास काही तपासणी केली जाते आणि त्या तपासणी नंतरच पैसे मिळू शकतील. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबातील एका सदस्याला विनंती अर्ज द्यावा लागेल. त्या अर्जात बेड नंबर, प्रिस्क्रिप्शन तसेच अंदाजित रक्कम या विषयी माहिती द्यावी लागेल. हे पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही दीर्घ किंवा किचकट प्रक्रियाचा सामना करण्याची गरज लागणार नाही.

Exit mobile version