Site icon ज्ञानसंवाद

शिक्कामोर्तब!शेवटी राज्य मंडळाची दहावी पाठोपाठ बारावी ची परीक्षाही रद्दच

आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला प्रस्ताव

मागील वर्षी पासुन कोरोनानी देशासह राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.गत वर्षी शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच कोरोनानी राज्यात थैमान घातले बारावी ची परीक्षा नुकतीच संपली होती तर दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात येऊन विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले.तर पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात उन्नत करण्यात आले.नविन शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू झाली नाही ईकडुन तिकडुन सुरू होणार तोच राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणी या लाटेत यंदाही पहीली ते नववी अकरावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.सोबतच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला.सीबीएसई , आयसीएसईनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.काल या संदर्भातील प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवला होता.हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला त्यामळे आता परीक्षा रद्द असे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version