Site icon ज्ञानसंवाद

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

शशिकांत इंगळे,अकोला:-

शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा देण्यात येणारा देशातील सर्वोच्च शिक्षक सन्मान पुरस्कार यासाठी ऑनलाईन आवेदन भरणे सुरू झाले आहे..

◼️शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार

▪️देशातील काही उत्कृष्ट शिक्षकाच्या अनन्य योगदानाचा आनंद साजरा करणे आणि ज्या शिक्षकांनी त्यांच्या वचनबद्धतेने आणि उद्योगाद्वारे शालेय शिक्षणाची गुणवत्ता च नाही तर आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन सुद्धा समृद्ध केले. अशा शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.

◼️शिक्षकांच्या पात्रतेच्या अटी

▪️खालील विभागांतर्गत मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक / उच्च / उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शाळा प्रमुख:

▫️ राज्य सरकार / स्थानिक प्रशासन / स्थानिक संस्थांनी चालवलेल्या शाळा / राज्य सरकारच्या सहाय्याने चालवलेल्या शाळा आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने चालवलेल्या शाळा.

▫️ केंद्र सरकार उदा.- केंद्रीय विद्यालय (KVs) / जवाहर नवोदय विद्यालय (JNVs) / संरक्षण मंत्रालय संचलित सैनिकी शाळा (MoD)/ अनुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) आणि आदिवासी विकास मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)

▫️केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित शाळा (CBSE) (वरील (a) आणि (b) व्यतिरिक्त)

▫️भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेशी संबंधित शाळा (CISCE) (वरील असलेल्या (a), (b) आणि (c) व्यतिरिक्त)

▫️सर्वसाधारणपणे सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कारासाठी पात्र नसतात परंतु ज्या शिक्षकांनी इतर सर्व अटी पूर्ण केल्या. असतील अश्या शिक्षकांना त्या वार्षिक दिनदर्शिकेतील किमान ४ महिने (उदा.- ३०-एप्रिल पर्यंत ज्यात राष्ट्रीय पुरस्कार संबंधित आहेत) यांचा विचार केला जाऊ शकतो.

▫️ या पुरस्कारासाठी शिक्षण प्रशासक, शिक्षण निरीक्षक आणि प्रशिक्षण संस्थांचे कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

▫️ट्युशन घेणाऱ्या शिक्षक / मुख्याध्यापक यात भाग घेता येणार नाही.

▫️केवळ नियमित शिक्षक व शाळा प्रमुख या पुरस्कारासाठी पात्र असतील.

▫️कंत्राटी तत्त्वावरील शिक्षक व शिक्षक मित्र पुरस्कारासाठी पात्र नाहीत.

◼️ वेळ मर्यादा

▪️१ जून ते २० जून २०२१
पर्यंत शिक्षकाकडून स्वतःचे नामांकन ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी वेब पोर्टल उघडले जाईल.

▪️ १ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१
जिल्हा निवड समितीच्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पोर्टल द्वारे राज्य निवड समितीकडे पाठवण्यात येतील.

▪️ १६ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१
राज्य निवड समिती किंवा आयोजन निवड समितीची स्वतंत्र शॉर्टलिस्ट राष्ट्रीय ज्युरीकडे पाठवली जाईल.

▪️२ ऑगस्ट २०२१
MoS द्वारे सर्व शॉर्टलिस्ट केलेले उमेदवाराणा राष्ट्रीय ज्युरी समोर प्रत्यक्षित सादरीकरण करणे. बाबत सूचना दिली जाईल. (NCERT येथे दरवर्षी होणाऱ्या नियमित प्रमाणे प्रत्यक्ष जाऊन किंवा 2020 वर्षप्रमाणे कोविड परिस्थितीनुसार ऑनलाईन प्रकारे) (मार्गदर्शक सूचनांनुसार जास्तीत जास्त 154 उमेदवार)

▪️५ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२१
ज्युरीद्वारे निवड प्रक्रिया

▪️ १६ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय ज्युरीद्वारे अंतिम यादी जाहीर.

▪️१८ ऑगस्ट २०२१
माननीय शिक्षणमंत्री यांच्या मंजूरी नंतर निवड झालेल्या उमेदवारांना सूचित केले जाईल.

▪️४ आणि ५ सप्टेंबर २०२१
पुरस्कार वितरण सोहळा.

अधीक सविस्तर माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ

https://nationalawardstoteachers.education.gov.in/Welcome.aspx

भेट द्या

Exit mobile version