Site icon ज्ञानसंवाद

झेडपी शिक्षकांच्या बदल्या आता नव्या ऑनलाईन प्रणालीद्वारे

राज्यात लवकरच एका नव्या संगणकीय प्रणालीला सुरुवात

शशिकांत इंगळे, अकोला

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा यामध्ये ऑनलाईन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे शिक्षकांच्या बदल्या नियमाप्रमाणे राबवल्या जाऊ शकतील. यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण विभागाने आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषदेमधील मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली आहे. ही समिती पाच सदस्यांची असून, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार तसेच वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे हे तीन सदस्य समितीमध्ये असणार आहेत. या ऑनलाईन प्रणालीसाठी लागणारे अंदाजपत्रक शासनाच्या आदेशानुसार या समितीच्या माध्यमातून तयार करून राज्य शासनाचा कडे पाठवले जाणार आहे. ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा परिषद सातारा, महाआयटी, एनआयसी आणि सी-डॅक या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सॉफ्टवेअर विकसित केल्यानंतर त्याची चाचणी करून प्रत्यक्षात वापर करावा. अशी सूचना देण्यात आल्या आहेत. सदरील ऑनलाईन प्रणाली तयार करण्यासाठी एक महिन्याची देण्यात आली असून लवकरच ही प्रणाली अस्तित्वात येणार आहेत.

Exit mobile version