Site icon ज्ञानसंवाद

सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव;नववी,दहावी,अकरावी गुणांच्या आधारे बारावीचा निकाल

प्रभाकर कोळसे,वर्धा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.

बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली.
@ राज्य शिक्षण मंडळाचेही लक्ष
बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार त्याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शिक्षण मंडळाचे लक्ष लागले आहे परीक्षा न झाल्यास बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे परीक्षा रद्द झाल्या तर राज्यातील शिक्षण मंडळे ही बारावीची गुण देताना सीबीएसई प्रमाणे नववी दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याचा पर्याय सुचवू शकतात.

Exit mobile version