Site icon ज्ञानसंवाद

ही ट्रिक वापरा आणि व्हाट्सऍप (Whatsapp) द्वारे लाईव्ह लोकेशन (Live Location) ट्रॅक करा

Whatsapp मधील या फिचर चा वापर ठरेल खूपच उपयोगी…

व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या घडीला सर्वात जास्त लोकांकडून वापरले जाणारे app आहे. स्मार्टफोन वापरणारा जवळजवळ प्रत्येकजण या अ‍ॅपचा वापर करतोच. पण या app मध्ये असणाऱ्या बऱ्याच फिचर विषयी बहुतांश लोकांना माहिती नसते अशाच एका खास फीचरबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्याचं नाव आहे, लोकेशन (Location).

Whatsapp मधील हे फिचर खूपच फायद्याचे आहे. जर आपण एखाद्या नवीन शहरात गेलो, आणि आपल्याला आपल्या नातेवाईक किंवा मित्राकडे जायचे असेल पण आपल्याला त्याचा पत्ता माहीत नसेल, तर अशा वेळी आपण त्यांना त्यांचे लोकेशन पाठवायला सांगायचे. मग ते लोकेशनच आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जाईल. स्त्रियांना आणि तरुणींना पण हे फिचर खूपच उपयोगी आहे. प्रवासात जर त्या एकट्या असतील व त्यांनी आपल्या घरच्या व्यक्तींना त्यांचं लाईव्ह लोकेशन ( Live Location) पाठवलं असेल तर त्या जिथेजिथे असतील तेथील लोकेशन घरच्या व्यक्तींना कळेल व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खूप फायद्याचे ठरेल.

चला तर हे फिचर कसं काम करतं आणि आपलं लोकेशन कसं पाठवायचं, याविषयी जाणून घेऊया.

खालील स्टेप्स follow करा.

★ सर्वप्रथम तुमचे व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.

★ आता चॅट (Chat) या पर्यायावर क्लिक करा.

★ त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीला आपले लोकेशन पाठवयाचे आहे, ती चॅट ओपन करा.

★ आता खाली, ज्या ठिकाणी आपण मेसेज टाईप करतो, तेथे आपल्याला 📎 असे क्लिपचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

★ येथे आपल्याला लोकेशन (Location) हा पर्याय दिसेल, तो निवडा.

★ आता आपल्याला ‘Send Your Current Location’ आणि ‘Share Live Location’ असे दोन पर्याय दिसतील.

★ आपण आता ज्या ठिकाणी आहोत, तेथील लोकेशन पाठवायचे असल्यास Send Your Current Location हा पर्याय निवडावा.

★ आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ, त्या त्या ठिकाणचे लाईव्ह लोकेशन पुढील व्यक्तीने ट्रॅक करावे असे वाटल्यास, ‘Share Live Location’ हा पर्याय निवडा.

★ हा पर्याय निवडल्यावर आपल्याला लाईव्ह लोकेशन बद्दल काही सूचना दिसतील, त्या वाचून Continue वर क्लिक करा.

★ आता आपल्याला, 15 मिनिटे, 1 तास आणि 8 तास असे, तीन पर्याय दिसतील. आपले लाईव्ह लोकेशन पुढील व्यक्तीला किती काळ दिसावे त्यानुसार योग्य तो पर्याय निवडा.

★ शेवटी कमेंट मध्ये काही टाईप करायचे असल्यास करा व send च्या चिन्हावर क्लिक करा.

★ जर आपल्याला निवडलेल्या वेळेआधीच लाइव्ह लोकेशन शेअरिंग बंद करायचे असेल, तर आपण पाठवलेल्या लाइव्ह लोकेशनच्या खालीच Stop sharing हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व stop करा.

आता तुमचे लोकेशन पुढील व्यक्ती ट्रॅक करू शकणार नाही.

—- सतीश लाडस्कर, भंडारा

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा.👇

Exit mobile version