विद्यार्थी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला, की यापुढे कोणतं शिक्षण घ्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडत असतो. मग आपण आपले मित्र, शिक्षक, नातेवाईक किंवा इतर सहकाऱ्यांना याबाबत विचारणा करतो. परंतु मिळणारी उत्तरे ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात. मग आपण किंवा आपल्या पाल्याने कोणत्या फिल्डमध्ये करिअर करावं याबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
हा संभ्रम दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आपल्या पाल्याच्या करिअरशी संबंधित संपुर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने, महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग, SCERT पुणे, यांनी खास इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *‘महाकरिअर‘पोर्टल* (mahacareerportal) सुरू केले आहे.
या पोर्टलवर जगभरातील सर्वच अभ्यासक्रम, तो अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये, अभ्यासक्रमासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा, त्यासाठी लागणारा खर्च, तसेच तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या / व्यवसायाच्या संधी आणि त्यातून मिळणारी आपली संभाव्य मिळकत यासंबंधी सखोल आणि परिपूर्ण माहिती दिलेली आहे. या पोर्टल वर लॉगइन होणे व विद्यार्थी नोंदणी करणे अगदी सोपं आहे. चला तर मग जाणून घेऊया करिअरचा परिपूर्ण खजिना.
खालील स्टेप्स follow करा व महाकरिअर पोर्टलवर आपली नोंदणी करून घ्या.
● सर्वप्रथम क्रोम (Chrome ) ब्राऊजर ओपन करा.
● आता सर्च बारवर mahacareerportal.com असे टाईप करा. किंवा खालील लिंकवर क्लिक करा.
● आता पोर्टल ची लॉगइन स्क्रीन दिसेल.
● ‘विद्यार्थी सरल आय डी’ या रकाण्यात आपली 19 अंकांचा सरल आयडी क्रमांक टाईप करा.
● सरल आयडी क्रमांक माहीत नसल्यास आपले वर्गशिक्षक, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या कडून प्राप्त करून घ्यावा.
● आता ‘पासवर्ड’ या रकाण्यात 123456 हा पासवर्ड टाईप करा. हा पासवर्ड सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच आहे.
● शेवटी ‘प्रस्तुत करा’ या टॅबवर क्लिक करा. आता आपण महाकरिअर पोर्टलवर लॉगइन होऊ.
● पोर्टल ओपन होताच आपल्याला, करिअर, कॉलेज, प्रवेश परीक्षा आणि छात्रवृत्ती अशा चार टॅब दिसतील.
● करिअर वर क्लिक केल्यास, आपल्याला विविध अभ्यासक्रम व करिअरच्या विविध क्षेत्रांची यादी दिसेल. त्यापैकी आपण करिअर करू इच्छित असलेला अभ्यासक्रम व क्षेत्र निवडा.
आता खाली आपल्याला त्या अभ्यासक्रमाविषयीची संपूर्ण माहिती बघायला मिळेल.
● ‘कॉलेज’ या टॅबवर क्लिक करून आपण निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांची यादी दिसेल.
● ‘प्रवेश परीक्षा’ या टॅबवरून आपल्याला संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exams) कधी आहेत, हे कळेल.
● ‘छात्रवृत्ती’ या टॅबवर आपण निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती / स्कॉलरशिप उपलब्ध आहेत याची माहिती दिलेली आहे.
☝️वरील युट्युब लिंकवरून विडिओ द्वारे आपण या स्टेप्स समजून घेऊ शकता.
अशाप्रकारे या महाकरिअर पोर्टल वर नोंदणी करून आपण संपूर्ण करिअरची माहिती जाणून घेऊ शकतो.
— सतीश लाडस्कर,भंडारा