विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमीकता.
प्रभाकर कोळसे
कोरोनाचे पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला याबाबत विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे करणार या बाबत संभ्रम होता.तो संभ्रम आज दुर झाला आहे.यासंदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री प्रा वर्षाताई गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत नुकतेच ही माहिती दिली.
@ठळक वैशिष्ट्ये
अंतर्गत मुल्यमापन द्वारे होणार विद्यार्थी उत्तीर्ण
प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा- २०गुण
लेखी परीक्षा- ३० गुण
नववीच्या अंतर्गत परीक्षेला- ५० गुण
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली होती.
मागील वर्षी पासुन कोरोनानी देशासह राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.गत वर्षी शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच कोरोनानी राज्यात थैमान घातले आणि दहावीच्या परीक्षेचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात येऊन विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले.तर पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात उन्नत करण्यात आले.नविन शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू झाले नाही, इकडुन तिकडुन सुरू होणार तोच राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणी या लाटेत यंदाही पहीली ते नववी अकरावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.सोबतच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.