Site icon ज्ञानसंवाद

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील दप्तर ठेवण्यासाठी लॉकर

‘ओझ्याविना शिक्षणाचा एक प्रयोग’

शशिकांत इंगळे,

वार्ताहर: (सोलापूर)सध्या covid-19 मुळे शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी येणाऱ्या आगामी वेळेत शाळा चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या लॉकरची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी या आधीच दीड कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर ठेवायला हे प्लास्टिकचे लॉकर खरेदी करण्यासाठी मंजूर केले आहेत. जिल्हा नियोजन समितीने दिनांक २७ जानेवारीला या खर्चाला मंजुरी दिल्यानंतर या संदर्भातली ऑनलाइन निविदा जाहीर केली. त्यानंतर या निविदेमध्ये वेगवेगळ्या संस्थांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी प्रति नग लॉकरची किंमत ठरवली होती, त्यानुसार मुंबईच्या तृप्ती उद्योग (३०७९०रु / प्रतिनग लॉकर), पुण्याच्या शुभ्रा (२९०७०रु / प्रतिनग लॉकर), सारथी (२९८००रु / प्रतिनग लॉकर), सर्वात कमी हीच सोलापूरच्या वरद इंटरप्राईझेस (२७७२०रु / प्रतिनग लॉकर) यांनी दिली होती. तर पुण्याची सारथी इंडस्ट्रीज यासाठी अपात्र ठरली. तर सर्वात कमी किंमत असलेल्या वरद इंटरप्राईझेस यांना ई-टेंडर मंजूर करण्यात आली. मंजुरीनंतर आता पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली. आहे यानुसार सुमारे १ कोटी ५८ लाख ८५ हजार ५३८ प्लास्टिक लॉकर पुरवठा केले जाणार आहेत. आणि उपलब्धतेनुसार लॉकर शाळेमध्ये पुरविण्यात येतील. शाळा बंदमुळे सध्या विद्यार्थ्यांसाठी लॉकर उपयोगी नसले तरी शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार आहे. एक वर्षापासून शिक्षण समितीकडे या नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक शाळेत लॉकर खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया घडलेली आहे. परंतु या सर्वांमध्ये बराच वेळ गेला असला तरी NTPC ने एक वर्षापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे २ कोटी एवढा निधी वर्ग केला आहे. या फंडातून दक्षिण सोलापूर तालुक्यामधील तीन शाळेमध्ये प्रयोगशाळा बनवायचा प्रस्ताव तयार केला आहे. कोरोना महामारी मुळे अजून तरी ही रक्कम उपयोगात आली नाही.

Exit mobile version