Site icon ज्ञानसंवाद

आपल्या निवृत्ती नंतर, NPS मध्ये आपल्याला किती पेन्शन मिळेल? जाणून घ्या या ‘पेन्शन कॅल्कुलेटर’ च्या मदतीने.

१ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्त राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी NPS ही नवीन योजना लागू करण्यात आली आहे.
बऱ्याच कर्मचार्यांना NPS मध्ये किती पेंशन मिळू शकते या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.अद्याप NPS मध्ये कशी व किती पेंशन मिळते…? ह्या बाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत.
आपल्या मनातील हा संभ्रम आम्ही आज दूर करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला निवृत्ती नंतर NPS नुसार किती पेन्शन मिळेल, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली न्यास (NPS Trust)यांच्या संकेतस्थळावर खाली दिल्याप्रमाणे माहिती भरा व जाणून घ्या.

(या पोष्ट च्या शेवटी/तळाशी Pension Calculator (संकेतस्थळ) ची लिंक दिली आहे.)

लिंकवर क्लिक करताच Pension Calculator ओपन होईल. त्यात खाली दिल्याप्रमाणे माहिती भरा आणि जाणून घ्या आपली NPS मध्ये मिळणारी पेन्शन.

◆ सर्वप्रथम MY DATE OF BIRTH या रकाण्यात आपली जन्म तारीख नमूद करा.

◆ आता, I WOULD LIKE TO CONTRIBUTE या रकाण्यात आपले सध्याचे १०% वेतन व शासनाचा १४% हिस्सा असे एकत्र करून येणारी ठराविक रक्कम नमूद करा. यामध्ये आपण भविष्यात होणारी वेतनवाढ लक्षात घेता एक सरासरी रक्कम नमूद करू शकतो.

◆ त्यानंतर, MY TOTAL YEAR OF CONTRIBUTION IS या रकाण्यातील माहिती आपल्या जन्मतारखेनुसार आपोआपच येईल.

◆ आता, MY EXPECTION OF RETURNE ON MY INVESTMENT या रकाण्यात आपल्याला भविष्यात किती टक्के परतावा मिळू शकेल ते अंदाजे नमूद करा. ( ७% ते २०% पर्यंत परतावा अपेक्षित आहे.)

◆ त्यानंतर, I WOULD LIKE TO PURCHASE ANNUITY FOR या रकाण्यात आपण कमीत कमी ४०% व जास्तीत जास्त १००% यापैकी योग्य ती टक्केवारी नमूद करू शकता.

◆ I AM EXPECTING ANNUITY RATE OF या ठिकाणी हा दर कमीत कमी ६% व जास्तीत जास्त १२% पर्यंत या दरम्यान नमूद करावा.

NPS पेंशन कॅलक्यूलेटरवर जाण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

एवढी माहिती बरोबर नमूद केली, की खाली आपल्या NPS निवृत्तीचे स्टेटस व निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन किती असेल हे आपल्याला कळेल.

–सतीश लाडस्कर, भंडारा

Exit mobile version