Site icon ज्ञानसंवाद

या स्पेशल ट्रिकद्वारे तुम्ही, व्हाट्सऍप (Whatsapp) वरील तुमची सिक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू शकता.

Whatsapp चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजकाल आपण calling पेक्षा मेसेजिंग जास्त करत असतो. आपण करत असलेल्या चॅटिंग मध्ये काही मेसेजेस हे वैयक्तिक तसेच सिक्रेट असू शकतात. त्यात बऱ्याचदा आपण करत असलेली chatting ही इतरांना दिसू नये असेही आपल्याला वाटत असते. त्यासाठी बऱ्याचदा आपण ती सिक्रेट चॅट डिलीट करतो.
जर तुम्ही व्हाट्सऍप वर एखाद्या व्यक्तीशी सिक्रेट मेसेजिंग करत असाल, व ती चॅट डिलीट न करता, इतरांना दिसू नये असे आपल्याला वाटत असेल, तर अशी एक खास ट्रिक Whatsapp मध्ये उपलब्ध आहे. त्या ट्रिकचे नाव आहे Archive. ही सेटिंग केल्यानंतर कोणीही तुमचे Whatsapp पाहिले तरी तुमची सिक्रेट चॅट त्या व्यक्तीला दिसणार नाही.

ही सेटिंग करण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.

◆ सर्वप्रथम व्हाट्सऍप (WhatsApp) सुरू करा.

◆ आता जी चॅट इतरांना दिसू नये असे आपल्याला वाटते त्या कॉन्टॅक्ट वर क्लिक करून ठेवा, म्हणजेच long टॅप करा.

◆ कॉन्टॅक्ट सिलेक्ट होईल व वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स च्या बाजूला एक खालच्या दिशेला बाण असलेले फोल्डर चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

◆ या चिन्हावर क्लिक करताच चॅट बॉक्स मधील आपण सिलेक्ट केलेली चॅट दिसेनाशी होईल.

◆ म्हणजेच आपली ती चॅट आता चॅटबॉक्स च्या अगदी तळाशी Archive नावाचे फोल्डर तयार झाले असेल त्यामध्ये सुरक्षित राहील.

◆ आपल्याला ती चॅट बघायची असल्यास किंवा मेसेजिंग करावयाची असल्यास Archive वर जाऊन ती चॅट उघडता येईल.

ही Archive केलेली (लपवलेली) चॅट पुन्हा चॅटबॉक्स मध्ये परत कशी आणावी?

◆ चॅटबॉक्स च्या तळाशी असलेल्या Archive वर क्लिक करा.

◆ आता लपवलेल्या चॅट क्लिक करून सिलेक्ट करा.

◆ कॉन्टॅक्ट सिलेक्ट झाल्यावर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स च्या बाजूला एक वरच्या दिशेला बाण असलेले फोल्डर चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.

◆ आपण लपवून ठेवलेली चॅट आता चॅटबॉक्स मध्ये परत आलेली आपल्याला दिसेल.

—— सतीश लाडस्कर,भंडारा

Exit mobile version