Site icon ज्ञानसंवाद

बुद्धाच्या विहारी व्हावे सुविचारी सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।धृ।।

चाल- स्वतंत्र (सांग समाजा तूझे)

बुद्धाच्या विहारी व्हावे सुविचारी
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।धृ।।

शांती समता बंधुता प्रज्ञाशीलेच वाणं।
त्रिशरण पंचशिलेच करुया अनुसरणं।।
बुद्ध धम्म संघाची खातोया भाकरी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।१।।

आपण आपलाच करावा सदा उद्धार।
अत्तं दिप भवं मंत्राचा करुणी उच्चार।।
दया करुणा ममतेची मिळाली चाकरी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।२।।

विज्ञानवादी द्रृष्टी शिकवी बुद्ध धम्म
पहले पाही मग विश्र्वास ठेवी संघ
प्रज्ञा शिल करुणेची शिवावी वाकरी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।३।।

अष्टांगिक मार्ग करी तृष्णेचा विनाश।
दहा पारमिताने पडे जिवनी प्रकाश।।
सत्य अनित्य अहिंसेची वाटही स्विकारी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।४।।

जीवंतपणी मिळतो खरा निर्वाण।
सम्यक साधनेत अरहंताचे दर्शन।।
दुख शोध निरोधाची आर्यसत्य गुणकारी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।५।।

जन्म ज्ञानप्राप्ती निर्वाणाच्या दिनी।
आदरांजली वाहितो श्रीबुद्धाचरणी।।
धम्मचक्र प्रवर्तनाची दिशा सूविचारी।
सद्धम्माची शिदोरी सोडुनी लाचारी।।६।।

कवी- संदिप अंबादास शेंडे(स.शिक्षक)
मंजीदाना काॅलनी, गिट्टिखदान,
काटोल रोड, नागपूर
मो.नं. ८३२९८९२९८४

Exit mobile version