Site icon ज्ञानसंवाद

काही मॉडिफाईड मराठी म्हणी.

१) आपला तो खोकला, दुसऱ्याचा तो कोरोना.


२) थांब लक्ष्मी, हातावर सॅनिटायजर देते.


३) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर.


४) गर्वाचे घर लॉकडाउन.


५) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत.


6) नवरा वैतागला लॉकडाउनने बायको वैतागली स्वयपाकाने


7) आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा


8) इकडे बायको तिकडे पोलिस


9) अति शहाणा त्याला होईल कोरोना


10) भित्यापाठी कोरोना राक्षस


11) घरोघरी सॅनिटायझर


12) हात धुणार त्यालाच खायला देणार


13) घरोघरी सगळेच बरमुड्यावरी


14)सॅनिटायझर पाहून हात पसरावे


15) हातावर ग्लोज तोंडावर मास्क


16) आपलेच सॅनिटायझर आपलेच हॅन्डवाॅश


17) दुरूनच आता बोललेले बरे


18) एकाचा कोरोना आख्ख्या गावाला वानुळा

हसा,,,टेन्शन कमी होईल,,,प्रतिकारशक्ती वाढेल…

😄😄😄😀😀😀😀😀😀😀

Exit mobile version