Site icon ज्ञानसंवाद

शिक्षण विभागाचा अजब निर्णय; विद्यार्थी गुणवत्ते वरून होणार शिक्षकाचे मुल्यमापन…!

आदिनाथ सुतार,(अह.नगर):-

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविणे अपेक्षित असते, सदर उपक्रमातून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच चार भिंतीपलिकडील व्यक्तिमत्व घडविणेही तेवढेच महत्त्वाचे असते.यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये शिक्षण अभिरुची निर्माण करून समाजाप्रती उत्तरदायित्वाचे व्यक्तिमत्व घडविणेही अपेक्षित आहे, यासाठी शिक्षक परिस्थिती अनुरूप मुलांना घडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हे कालपरत्वे सिद्ध झालेले आहे. प्रशिक्षण घेणे व मुले गुणवत्तापूर्ण असणे या सर्वथा दोन भिन्न बाबी आहेत,शिक्षक परिस्थिती अनुरूप शिक्षक प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा अध्यापनात वापर करून मुलांना घडवतच असतात.असे असतांना विद्यार्थीची एका सामान्य परीक्षा घेऊन त्याव्दारे शिक्षकांची गुणवत्ता ठरविणे चूकीचे असल्याचे मत महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.
अध्यापन सुलभ होते का,गुणवत्ता सुधारते का. यासाठी शिक्षण विभागाकडून कोट्यावधी रूपये खर्च करून शिक्षक प्रशिक्षणासाठी एक नवीन प्रणाली विकसित केली जात आहे.परंतु सदर खर्चास शिक्षक संघटनांचा प्रखर विरोध आहे. तद्वत शिक्षण विभागाने जास्तीत -जास्त अनूभूतींव्दारे शिक्षण देणेकामी तशा सोयी निर्माण करणे,आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षक स्वतःच एक अध्यापन प्रणाली आहे व हे महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षकांनी आपल्या आध्यापन कौशल्यातून अंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मान मिळवून, सिद्ध केले असतांना तसेच पूर्ण महाराष्ट्रभर मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता अधोरेखित झालेली असतांना विद्यार्थी चाचणी घेऊन शिक्षकाची गुणवत्ता ठरविणे चूकीचे असल्याचा सूर महाराष्ट्रातील शिक्षकांमधून उमटत आहे.

Exit mobile version