Site icon ज्ञानसंवाद

क्रोम (Chrome) ब्राऊजर वर येणारे नोटिफिकेशन (Notifications) तुमची डोकेदुखी वाढवतात का?

Do notifications from Chrome browser increase your headaches?
खालील टिप्स वापरून तुम्ही या त्रासातून मुक्ती मिळवू शकता.

लॉकडाउनच्या काळात, वर्क फ्रॉम होम साठी किंवा वैयक्तिक कामासाठी आपण, तसेच सुट्टीच्या काळात किंवा ऑनलाईन अभ्यासासाठी आपले पाल्य बराच वेळ मोबाईल वापरत असतात. अशातच फोनच्या नोटिफिकेशन बार वर विविध साईट्स वरून अनेक हवे नको ते नोटिफिकेशन्स डिस्प्ले होत राहतात. त्यात काही अश्लील व्हिडीओचे पण नोटिफिकेशन असतात. या व्हिडीओ चा बालमनावर वाईट परिणाम होऊ शकतो हे निश्चीत आहे.

हे टाळण्यासाठी क्रोम मध्ये सेटिंग करावी लागते जी अगदी सहज व सोपी आणि अत्यावश्यकही आहे. ही setting एकदा केली की Chrome वर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्स मुळे होणाऱ्या त्रासातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता मिळू शकेल.

ही सेटिंग करण्यासाठी खालील टिप्स follow करा.

1) सर्वप्रथम क्रोम (Chrome) ब्राऊजर ओपन करा.

2) त्यानंतर सर्वात वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.

3) आता खाली असलेल्या पर्यायांपैकी सेटिंग्ज (settings ) हा पर्याय निवडा.

4) त्यानंतर आलेल्या पर्यायांमधून नोटिफिकेशन्स (Notifications) वर क्लिक करा.

5) आता सर्वात वर असलेलं ऑन (On) हे बटन ऑफ (Off) करा.

आता आपल्याला Chrome क्रोम वरून कोणतेही नोटिफिकेशन्स येणार नाहीत.

शब्दांकन- सतीश लाडस्कर,भंडारा

Exit mobile version