Site icon ज्ञानसंवाद

बनावट फेसबुकर पासून फसवणूक टाळा व असे करा आपले फेसबुक खाते सुरक्षित

सध्या बनवट फेसबुक खात्यावरून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.या परिस्थितीत स्वतः चे फेसबुक खाते कसे सुरक्षित ठेवावे व बनावट फेसबुक खात्यावरून होणारी फसवणूक कशी टाळता येईल यासाठी काही खास सेटिंग..

◼️ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधा, स्वत:ला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे. त्यांच्याकडुन सदर फेक प्रोफाईलची लिंक (URL) मागवुन घ्या.

◼️त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (…) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा. • तुमच्या समोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

• Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणी Celebrity.

आपण आपलीच बेनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा आणी Next करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

🔲इतरांनी सदरची फेक प्रोफाईलचा रिपोर्ट करतांना…

◼️प्रोफाईलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (…) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.

◼️तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

◼️Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणी Celebrity.

◼️आपण मित्राची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी A Friend हा ऑप्शन सिलेक्ट करा आणी Nextकरा. Next केल्यानंतर Which Friend? असा प्रश्न समोर येईल तेव्हा ज्या इसमाची फेक प्रोफाईल तयार करण्यात आलेली आहे ते अकाउंट सिलेक्ट करावे. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

🔲फेसबुक प्रोफाईल सुरक्षीत कसे करावे…

• स्वत:ची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसु नये याकरीता… Setting Privacy Setting Who Can See Your Friend List तिथे Only Me करावे.

• स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो / कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्ती Copy/Download करू नये याकरीता… Setting Profile Locking → तिथे Lock Your Profile करावे.

• अनोळखी व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवु नये याकरीता… Setting Privacy Setting Who Can Send Friend Request तिथे Friends Of Friend करावे.

◼️स्वत:चा फेसबुक अकाउंट सुरक्षीत ठेवणे करीता. Setting → Security And Login Two-Factor Authentication करावे.

● स्वत:चा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला ई-मेल आयडी कोणास दिसु नये याकरीता. Setting Privacy Setting Who Can Look You Up Using The E-Mail Address You Provided → तिथे Only Me करावे.

◼️स्वत:चा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला मोबाईल क्रमांक कोणास दिसु नये याकरीता. Setting Privacy Setting → Who Can Look You Up Using The Phone Number You Provided → तिथे Only Me करावे.

सायबर पोलीस स्टेशन अमरावती यांची मार्गदर्शक pdf आवश्य वाचा:-

Exit mobile version