Site icon ज्ञानसंवाद

एस.आर.जिंदाल शिष्यवृत्ती योजना;इयत्ता दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी बारावी किंवा इतर कोणत्याही पदविका, पदवी, आयटीआय किंवा कोणत्याही कोर्सेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

राकेश नांद्रे,नाशिक


इयत्ता दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी बारावी किंवा इतर कोणत्याही पदविका, पदवी, आयटीआय किंवा कोणत्याही कोर्सेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन, हॉस्टेलची फी, परीक्षा फी इत्यादी सर्व फी शिष्यवृत्ती मार्फत भरण्यात येईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिंदाल फाउंडेशन च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करणे अनिवार्य आहे. सदर अर्ज करताना कुणीही मध्यस्थी टाकण्यात येऊ नये. तसेच सदर अर्ज करताना जोडावयाची कागदपत्रे ही खरी व योग्य असावीत.
सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
https://www.sitaramjindalfoundation.org/ या वेबसाइटवरून अर्ज तसेच त्या अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे व इतर अटी व नियम या संदर्भातील माहिती पत्रक डाऊनलोड करून घ्यावे. इतर कुठूनही डाऊनलोड केलेले किंवा कापून घेतलेला अर्ज स्विकारला जाणार नाही हे लक्षात ठेवावे.

माहितीपत्रक:-

Exit mobile version