Site icon ज्ञानसंवाद

तुमच्या आधार कार्डवर असलेला तुमचा पत्ता बदलला आहे का? मग घरच्याघरी तुम्ही आपला नवीन पत्ता अपडेट करू शकता! कसा? चला जाणून घेऊया.

Has your address on your Aadhar card changed? Then you can update your new address at home! How? Let’s find out.

आजकाल प्रत्येक कार्यालयीन कामात असो किंवा इतरही ठिकाणी, आधार कार्ड हा महत्त्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्यावरील माहिती नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे. नोकरीत असलेल्या बऱ्याच जणांचा पत्ता हा कायम नसतो. त्यात बऱ्याचदा बदलीमुळे बदल होत असतो. आपल्या आधारकार्ड वरील पत्ता बदलवण्यासाठी आधार केंद्रात जाऊन रांगेत लागणे व त्यासाठी दोन तीन वेळा हेलपाटे घालणे फारच त्रासदायक आहे.
परंतु, आता आपल्याला या कामासाठी अधिक त्रास सहन करावा लागणार नाही. कारण आता आपण अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल वरूनच आपल्या आधारकार्ड वरील पत्ता अपडेट करू शकतो.

चला तर मग खाली दिलेल्या स्टेप्स follow करा आणि आपला पत्ता अपडेट करा.

  1. सर्वप्रथम कोणत्याही ब्राऊजर वरून
    https://uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.
  2. त्यानंतर ‘My Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा व नंतर ‘Address Validation Letter’ हा पर्याय निवडा.

3.आता आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेल्या रकाण्यात आपला 12 आकड्यांचा आधार क्रमांक किंवा 16 आकड्याची व्हर्चुअल ID नोंदवा.

  1. Enter Captcha या रकाण्यात दिलेला कॅप्चा कोड टाईप करा आणि Submit वर क्लिक करा.
  2. आता ‘Send OTP’ हा पर्याय निवडा.
  3. थोड्याच वेळात तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  4. आता verification link वर क्लिक करा आणि आपल्या मोबाईल वर आलेला OTP टाईप करा.
  5. काही क्षणातच टेक्स्ट मेसेज द्वारे आपल्याला एक Service Request Number (SRN) प्राप्त होईल.
  6. आता प्राप्त झालेल्या SRN ने लॉग-इन करा व Address preview वर क्लिक करा. आता आपल्या स्थानिक भाषेत आपला बदललेला पत्ता टाईप करा.
  7. त्यानंतर declaration वर √ करा आणि Submit हा पर्याय निवडा.

11.आपला नवीन पत्ता स्थानिक भाषेत Edit करा आणि Save वर क्लिक करा.

  1. आता परत एकदा Declaration वर √ टिक मार्क करा व Submit Request हा पर्याय निवडा.
  2. एवढं झालं की आपल्याला पोस्टाने एक ‘एड्रेस व्हॅलिडेशन लेटर’ पाठवण्यात येईल, ज्यामध्ये एक सिक्रेट कोड असेल.
  3. लेटर आल्यानंतर परत एकदा सुरुवातीला दिलेल्या UIDAI च्या वेबसाईटवरून Proceed to Update Address लिंकवर क्लिक करा.
  4. त्यानंतर आपल्या 12 अंकी आधार नंबरसह लॉग-इन करा आणि Update Address via Secret Code हा पर्याय निवडा.
  5. आता पोस्टाने आलेला सीक्रेट कोड टाका. त्यानंतर नवीन Address ला preview करा आणि शेवटी ‘Submit’ या पर्यायावर क्लिक करा.

आता आपल्या आधार कार्ड वरील आपला जुना पत्ता बदलून नवीन पत्त्यासह नवीन आधारकार्ड पोस्टाने आपल्या घरी येईल. तसेच आपण आपले आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकतो.

— सतीश लाडस्कर,भंडारा

Exit mobile version