Site icon ज्ञानसंवाद

स्वाध्याय उपक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया

👩‍💼🧑‍💼खालील क्रमाने विद्यार्थी नोंदणी करावी 👇

1️⃣ https://wa.me/918595524519?text=Namaskar
वरील लिंक वर क्लिक करावे या द्वारे आपण स्वाध्याय उपक्रमाच्या व्हाट्सअॅप वर जॉईन व्हाल.किंवा 8595524519 या नंबरवर Namskar किंवा Hello असे टाईप करून पाठवा

2️⃣ त्यानंतर आपले शिक्षणाचे माध्यम निवडावे.जसे मराठी साठी 1,सेमी इंग्रजी 2,उर्दू माध्यमासाठी 3

3️⃣ माध्यम निवडल्यानंतर शर्ती व गोपनीयता आपणांस मान्य आहे का असे विचारण्यात येईल मंजूर असल्यास 1 व मंजूर नाही साठी 2 टाईप करून पाठवावा.

4️⃣ यानंतर विद्यार्थी ज्या इयत्तेत सध्या शिक्षण घेत आहे ती इयत्ता निवडावी (# 1 मे 2021 ही तारीख गेल्यामुळे पुढची इयत्ता न निवडता 1 मे 2021 पूर्वी विद्यार्थी ज्या इयत्तेत होता तीच इयत्ता निवडावी)

5️⃣ विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव टाईप करून पाठवावे

6️⃣ ११ अंकी शाळेचा udise कोड टाईप करून पाठवावे
( #विद्यार्थ्यांना udise code सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कळवावेत)

7️⃣ आपण पाठवलेल्या udise code वरून आपल्या शाळेचे नाव आपणांस पाठवले जाईल ते योग्य आहे का?याची पुष्टी करण्यासाठी- योग्य असल्यास 1 टाईप करावा किंवा योग्य नसल्यास पुन्हा टाईप करण्यासाठी 2 टाईप करून पाठवावा.

8️⃣या नंतर आपणांस सराव सुरू करू इच्छिता का? असे विचारण्यात येईल.आपले उत्तर होय असल्यास 1 निवडावा व नाही असल्यास 2 निवडावा

9️⃣ आपण 1 टाईप करून सराव सुरू इच्छुक आहात असे कळविल्यावर आपली स्वाध्याय प्रश्नावली सुरू होईल ज्यात प्रत्येक प्रश्नाखाली पर्याय दिलेले असतील योग्य पर्याय निवडत आपली प्रश्नावली सोडवावी,

🔟 सर्व प्रश्न सोडवून झाले की आपणांस चुकलेले व बरोबर आलेले उत्तरे याची सूची बघायला मिळेल

संकलन- भागवत भंगे

अधिक माहितीसाठी खालील मार्गदर्शन pdf बघावी:-

(pdf ची पुढील पाने पाहण्यासाठी pdf च्या प्रथम पानास वरच्या दिशेने सरकवा पुढील पाने दिसतील.)

Exit mobile version