शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा आणि शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेतील विविध पदांच्या अनेक रिक्त जागा भरून, पदोन्नती व समुपदेशनाच्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात यावे, अशी मागणी नागपूर भागातील शिक्षकांनी केली आहे.
नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत पदोन्नती विषय पदवीधर शिक्षक १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १५, शिक्षण विस्तार अधिकारी ११ एवढेच नाही तर केंद्रप्रमुख यांच्या आणखी १०० पदेही रिक्त आहेत.
मार्च महिन्यात नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून पदोन्नती प्रक्रिया सुरू केली होती. परंतु ती मध्येच बंद पडली या प्रक्रियेत नुकतीच उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची २७ पदे पदवनत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना मधून भरण्यात आली.अशाच प्रकारे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विशेष पदवीधर शिक्षक व उर्वरित उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदाकरिता यांची पदोन्नती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नागपूर जिल्हा परिषदेने पार पडली. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली.