आदिनाथ सुतार,राजूर(अह.नगर)
सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतभर व महाराष्ट्रात लाॅकडाऊन चालू असून,आशा परिस्थितीत कुलुपबंद असणारी माणसं टिव्हीवर तेच ते कार्यक्रम तसेच मोबाईल वरील कोरोनाच्या त्याच- त्या भयभित करणाऱ्या बातम्यानं माणूस अस्वस्थ झाला आहे. आशा परिस्थितीत अस्वस्थ मनाला व मानसांना तसेच बाळगोपाळांच्या करमणूकीसाठी ‘ई साहित्य प्रतिष्ठान’ या वेबसाईटतर्फे विविध विषयांवरील असंख्य नविन व दुर्मिळ पुस्तकांचा खजिना प्रतिष्ठाननं खुला केला असून आपली तेरा वर्षांची ई साहित्य उपलब्ध करून देण्याची परंपरा लाॅकडाऊनच्या काळात नवनवीन पुस्तकांच्या भेटीसह आणखी संमृध्द केली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात दाहीदिशांना भरकटणार्या मनाला सुखातीत अनूभवाची तरलता देण्याचे काम येथील पुस्तके निश्चित करतील असा आत्मविश्वास प्रतिष्ठाननं व्यक्त केला आहे. सदर वेबसाईट वर अरूण कुलकर्णी लिखीत रंगारी सौंदर्या, या कथासंग्रहासह एक होती राजकन्या, कठोपनिषद,श्रवणधारा, लिओस्टाॅलस्टाय,आव्हान, विकासचक्र, मन शुध्द तुझे,मंथनरत्ने, आधुनिक बोधकथा, वाडा.रत्नाईची गढी, काव्यमंजिरी, हलकं फुलकं शिक्षण, अनुभव अमृत या कथा कादंबर्यांसह,संगिता जोशी यांचे रुपेरी गजल या पुस्तकांसह हजारो वाचणीय पुस्तके वाचकवर्गासाठी उपलब्ध आहेत. तरी विविध अनूभूती संमृध्द करणार्या पुस्तकांचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
ई-साहित्य प्रतिष्ठान ला भेट देण्यासाठी:- http://www.esahity.com/