Site icon ज्ञानसंवाद

फक्त 10 मिनिटांत बनवा नवीन PAN CARD. तेही FREE, आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय

Make your PAN CARD only in 10 minutes. It’s absolutely FREE……

या प्रक्रियेत अर्जदाराला कोणतीही कागदपत्रे देण्याची किंवा UPLOAD करण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही.
खाली दिलेल्या स्टेप्स follow करा आणि आपले PAN CARD allot करून घ्या

1.Free PAN CARD साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जावे लागेल. त्यानंतर “Instant PAN through Aadhaar” मध्ये जाऊन “Quick Links” वर क्लिक करा.

वेबसाईट ची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.

https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/

  1. वरील साईटवर गेल्यास आपल्याला “Get New PAN” हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  2. आता please enter your aadhar number for PAN Allotment यापुढे असलेल्या रकान्यात आपला आधार नंबर टाकावा लागेल.

त्याखाली एक Captcha कोड दिलेला असेल, त्याच्याच खालील रकाण्यात आपल्याला दिलेला Captcha कोड जसेच्या तसा टाईप करायचा आहे.

आता खाली I confirm that च्या आधी असणाऱ्या चौरासात right मार्क करून घ्या.
आणि शेवटी Generate Aadhar OTP हा पर्याय निवडा.
लवकरच तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो Verify करावा.

4.त्यांनतर आपल्याला आपल्या आधार कार्डची माहिती validate करावी लागेल.

  1. तसेच आपला Email Id ही validate करावा लागेल.
  2. आपण दिलेली संपूर्ण माहिती यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून verify केली जाईल. e-KYC डेटा validate केल्यानंतर तुम्हाला तुमचे PAN CARD दिले जाईल.
    वरिल संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास कमीत कमी 8-10 मिनिटं लागतील.

7.आता मुख्य वेबसाईटवर “Check Status/ Download PAN” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

  1. आता आपले PAN CARD आपण PDF फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतो.

टीप:-आपल्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर या प्रक्रियेद्वारे PAN CARD डाउनलोड किंवा Allot करू शकत नाही.जे लोक पहिल्यांदाच पॅन कार्डसाठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठीच ही प्रक्रिया आहे. तसेच, आपल्या आधारला मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि आधारकार्डवर पूर्ण जन्मतारीखही असणे आवश्यक आहे.

— सतीश लाडस्कर,पवनी(भंडारा)

Exit mobile version