Site icon ज्ञानसंवाद

आदिवासी विकास सेवेतीलअधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता विभागीय परिक्षांचे आयोजन आयुक्तालय स्तरावरून करण्यात यावे.

सन २०२१ पासून विभागीय परिक्षांचे आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार नसून, सदर विभागीय परिक्षांचे आयोजन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे.

२. त्यानुषंगाने आदिवासी विकास सेवेतील सर्व संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता विभागीय परिक्षांचे आयोजन आयुक्तालय स्तरावरून करण्यात यावे. त्याकरीता संबंधित विभागीय परिक्षांच्या नियमामध्ये त्याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

सन २०२१ पासून विभागीय परिक्षांचे आयोजन आयुक्तालय स्तरावरून करावयाचे असून, आयुक्तालय स्तरावर उपलब्ध अधिकारी / कर्मचारी यांच्यामधून परीक्षा आयोजनासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची कार्यवाही करावी.

४.वरील निवेदनांन्वये वर्ग-३ कर्मचाऱ्यांच्या विभागीय परिक्षा मागील १० वर्षात केवळ ३ वेळा झाल्या असल्याने सदर कर्मचारी हे पदोन्नती / परिवीक्षाधीन कालावधी / वेतनवाढी यापासून वंचित असल्याने त्यांनी निवेदने सादर केली आहेत. तरी, त्यानुषंगाने तात्काळ विभागीय परिक्षांचे आयोजन करणे आवश्यक असल्याने उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून आदिवासी विकास सेवेतील वर्ग १ ते वर्ग-३ मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता तात्काळ विभागीय परिक्षांचे आयोजन करण्याबाबतची कार्यवाही करावी,

अशी विनंती कार्यासन अधिकारी,महाराष्ट्र शासन यांनी आयुक्त,अदिवासी विकास यांच्याकडे केली आहे

संदर्भित पत्र:-

Exit mobile version