Site icon ज्ञानसंवाद

नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करून लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

नाशिक:- सद्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अधिक गरजेचे आहे. शासन स्तरावरुन वेळोवेळी लसीकरणाबाबची माहिती देवूनही आदिवासी भागामध्ये आज्ञानाने किंवा अफवाने अजूनही पाहीजे तसा लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय / अनुदानीत आश्रमशाळा व शासकीय वसतीगृह येथील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांनी खावटी अनुदान योजनेसंदर्भात गावनिहाय सर्वेक्षण अतिशय मोलाचे कामकाज केलेले आहे. त्याच प्रमाणे सामाजीक बांधीलकी म्हणून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती व समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना खावटी अनुदान योजनेचे सर्वेक्षण कामकाजासाठी नेमून दिलेल्या गावातील नागरीकांनी कोराना लस घेण्यात आलेली आहे किंवा नाही याबाबतची माहिती घेण्यात यावी. व ज्या नागरीकांनी लस घेतलेली नाही अशा नागरीकांना समुपदेशन करावे व लस घेण्यास प्रवृत्त करावे. तसेच संबंधीत कर्मचारी यांनी दैनंदीन घेलेली माहिती गावनिहाय मुख्याध्यापक यांचेकडे सादर करावी. मुख्याध्यापक यांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचारी यांनी लसीकरणाबाबतची दिलेली माहिती एकत्रीत संकलीत करुन प्रकल्प कार्यालयास (शिक्षण शाखेत) सादर करावी.असे प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांनी प्रकल्पातील सर्व मुख्याध्यापक व गृहपाल यांना पत्राद्वारे कळविले आहे.

संदर्भित पत्र:-

Exit mobile version