जाणून घ्या ई-पास मिळविण्याची प्रक्रिया
रामसिंग राजपूत,नाशिक:- राज्य शासनाने महाराष्ट्रात १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला राज्यात ई-पास शिवाय प्रवास करणे कठीण होणार आहे. यासाठीच शासनाकडून ई-पासची तरतूद करण्यात येत आहे.
👉 कोणत्या कामासाठी ई-पास मिळेल
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, जवळचा नातेवाईक गंभीर आजारी असल्यास, अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाह सोहळा अशा कारणांसाठी ई-पास द्वारे प्रवास करता येईल. अशा वेळेस वरील कारणासंबंधीचे पुरावे जवळ असणे आवश्यक आहे.
👉 ई-पास कसा मिळवता येईल
सदर ई-पास कोणताही व्यक्ती काढू शकतो फक्त त्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.
▪️सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/ या संकेत स्थळाला भेट द्या.
▪️ आता apply for pass here या पर्यायावर क्लिक करा.
▪️ ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे तेथील पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा.
▪️ यानंतर स्वतःचे नाव, प्रवास दिनांक, प्रवासाचे प्रारंभिक आणि अंतिम ठिकाण, मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक,सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवासाचे कारण, सोबतच्या प्रवाशांची संख्या इ. माहिती भरून स्वतःचा फोटो, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट, ओळख पत्र जोडावे.
आपण जोडलेल्या कागदपत्रांची आणि कारणांची शहानिशा झाल्यावरच पोलीस विभागामार्फत ई-पास दिले जाईल.
Stay Safe, Stay Healthy and Stay Happy
धन्यवाद.