Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील अनुसूचित जमातीच्या नागरीकांना रेमडिसीव्हीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करून देण्याबाबत-

आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात कोराना या आजारामुळे दाखल झालेल्या अनुसुचित जमातीच्या रुग्णास रेमडिसीव्हीर इंजेक्शनसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प स्तरावर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना रुपये १०.०० लक्ष (अक्षरी रु. दहा लक्ष) पर्यंतचा खर्च करण्यास न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च करताना प्रकल्प अधिकारी यांनी खालील अटींची पूर्तता होत असल्याची खातरजमा करावी.

१. रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा. त्याचे वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लक्ष पर्यंत असावे.

२. खाजगी रुग्णालय हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत नसावे.

३. आदिम जमाती / दारिद्रय रेषेखालील/विधवा / अपंग / परितक्क्या निराधार महिला यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा.

४. रेमडिसीव्हीर इंजेक्शनसाठी खर्च करतांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास यांनी रेमडिसीव्हीर इंजेक्शनसाठी सद्यस्थितीत असलेल्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा.

सविस्तर माहितीसाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे- 

Exit mobile version