ऑनलाईन परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी सुचना ( मे 2021 )
1. विद्यापीठाने मे २०२१ मध्ये विविध शिक्षणक्रमांच्या ( डिसेंबर 2020 च्या प्रलंबित) परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या असून त्यांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील शिक्षणक्रमांच्याच परीक्षा होतील.
2. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Browser Link ( https://ycmou.unionline.in उपलब्ध करून दिली जाईल. सदर लिंक विद्यार्थ्याने कॉपी करून ओपन करून परीक्षा प्रणालीत प्रवेश करायचा आहे.
3. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी विद्यापीठाने याच लिंकवर डेमो परीक्षा उपलब्ध करून दिली आहे. ती मूळ परीक्षेआधी सोडवून सराव करावा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा देताना अडचणी येणार नाही.
4. ऑनलाईन परीक्षा सुरु करणेपुर्वी विद्यार्थ्यास परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना त्यास प्रथम कायम नोंदणी क्रमांक (PRN) टाकावा लागेल. त्यानंतर त्याचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्याचे नाव व कायम नोंदणी क्रमांक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःची जन्मतारीख ऐंटर करावी ती नोंदणी अर्जात असलेलीच असावी). प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षेचा 60 मिनिटांचा कालावधी सुरु होईल.
5. वेळापत्रकानुसार परीक्षा दोन सेशनमध्ये सकाळी (M) 8 ते 1 व दुपारी (A)3 ते 8 यावेळेत होईल. ऑनलाईन लॉगईन स्लॉट टाईम. M = Morning = सकाळी 8.00AM To 1.00PM व A = Afternoon दुपार3.00PM To 8.00PM परीक्षा पद्धती बहुपर्यायी प्रश्न प्रत्यक्ष परीक्षा 60 मिनिटे वेळापत्रकातील प्रोग्रॅम कोडनुसार आपला पेपर किती तारखेला किती वाजता, कुठल्या लॉगईन स्लॉट मध्ये आहे ते पाहून विद्यार्थ्याने पुरेशा वेळ आधी परीक्षेला सुरुवात करावी. लॉगईन स्लॉट टाईम 5 तासांचा असला तरी प्रत्यक्ष परीक्षेचा वेळ 60 मिनिटे आहे, त्या कालावधीत परीक्षा संपवणे आवश्यक राहील. विद्यार्थ्याने परीक्षेला उपलब्ध 50 प्रश्नांपैकी 30 प्रश्न 60 मिनिटांत सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 60 गुणांची परीक्षा होईल आणि 60 गुणांचे रुपांतर 80 गुणात करण्यात येईल.
6. विद्यार्थ्याने परीक्षा सुरु केल्यानंतर कुठल्याही तांत्रिक कारणाने Logout झाल्यास विद्यार्थ्याला वेळापत्रकानुसार दिलेल्या Login Slot Time मध्ये पुन्हा Login करता येईल व त्याला त्याचा शिल्लक वेळ मिळेल आणि उर्वरित राहिलेले प्रश्न सोडविता येतील.
7. विद्यार्थ्यांना त्याची कुठल्या विषयाची परीक्षा होणार आहे यासाठी या Event ला त्यांची परीक्षा होणार आहे त्यांचे यादी विद्यापीठाच्या पोर्टलला दि. 30/04/2021 रोजी उपलब्ध करून दिले जाणार आहे, त्यानुसारच्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्याने द्यावी.
8. परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अभ्यासकेंद्रांनी प्रती सत्र एका व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्याशी संबंधित अभ्यासकेंद्रावरून घ्यावा आणि परीक्षेसंदर्भात अडचणीबाबत अभ्यासकेंद्रावरील संबंधित व्यक्तीशी संपर्क करावा.
9. ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांवर परीक्षा कालावधीत मदत कक्ष स्थापन करणेत आले आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
सौजन्य- YCMOU NASHIK