Site icon ज्ञानसंवाद

पुज्यनीय बाबासाहेब,

पुज्यनीय बाबासाहेब

हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून
मुक्त केले तू भीमराया,
जनावरातून माणसात आणाया
झिजविली तू अवघी काया.
दलित,शोषित, पीडित जनतेचा
तूच होता एकमेव आधार,
संविधानाच्या लेखणीतून न्याय दिला
कसे रे मानू आम्ही तुझे आभार.
प्रत्येक वर्गाच्या उत्थान अन न्यायासाठी
स्वातंत्र्य,समता नि बंधुतेची हाक दिली,
विश्वात मोठी अशी ही लोकशाही
सकल जणांच्या मनी रुजून गेली.
कामगारांचा नेता अन महिलांचा पिता
आधुनिक भारताचा तू निर्माता,
कृषि, समाज, राज्य नि अर्थ शास्त्राचा
तूच खरा आहेस प्रणेता.
पिढयां न पिढ्या पाईक तूझ्या रं
जन्म जरी दिला आई-बापानं,
तुच माय-बाप रं आमचा
जगतोय आम्ही तुझ्या विचारानं.


कवी
सागर रा. वानखडे
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दहिंदुले
तालुका- सटाणा, जिल्हा -नाशिक

Exit mobile version