Site icon ज्ञानसंवाद

    ‘स्क्रीन टाइम करा कंट्रोल’

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं व ‘वर्क फ्रॉम होम’ हे नवीन फॅड सुरू झालं तेंव्हापासून लोकांचा स्क्रीन टाइम वाढत असल्याचं समोर आलं. याचबरोबर सोशल मीडियाचा वावरही वाढलाय. आठवडाभरात सोशल मीडियावरील वावर तब्बल ८७ टक्क्यांनी वाढला आहे. लॉकडाउनच्या आधी एक व्यक्ती आठवड्याला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती तोच वेळ आता आठवड्याला २८० मिनिटं इतका झालाय. म्हणजे दिवसाला तब्बल चार तास लोक सोशल मीडियावर वावरू लागले आहेत.या सर्वामुळे डेटा वापरातही तब्बल ३० टक्के वाढ झालीय. परिणामी, अनेकांचा स्क्रीन अॅडिक्शनसारखं जाणवू लागलेलं आहे.हा लॉकडाउन काही काळापुरताच मर्यादित आहे. जेव्हा तो संपेल आणि सर्वजण नियमित कामाला सुरुवात करतील तेव्हा स्क्रीन टाइम कमी करणं त्रासदायक ठरणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या स्क्रीनमध्ये रमल्यामुळे अनेक तरुणांचं मानसिक संतुलन बिघडण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. परिणामी, घरात भांडणंही होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आपण आत्ताच स्क्रीन टाइमला लगाम लावणं आवश्यक आहे.
हे कसं करता येईल ते बघूया पुढील अॅप च्या मदतीने ….
”डिजिटल वेलबिइंग’ हे अॅप प्ले स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करून घ्या.
आपल्या स्क्रीन टाइमची काळजी घेण्यासाठी सर्वांचा मित्र आणि लोकप्रिय सेवा गुगलनेच सर्वाधिक काळजी घेतली आहे. हे अॅप फोनच्या सेटिंग्जमध्ये दिसतं. तुम्ही किती वेळ स्क्रीनवर असता, कोणतं अॅप किती वेळ वापरता इथपासून सर्व तपशील अॅपमध्ये नोंदवला जातो. यामुळे तुम्ही कोणत्या अॅपवर अनावश्यक वेळ वाया घालवत आहात हे ठरवता येऊ शकतं. यात असे काही टूल्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही एखादं अॅप अमुक एक वेळ वापरल्यावर ते अॅप आपोआप बंद होतं. उदाहणार्थ, दिवसाला युट्यूबचा वापर ३० मिनिटं करायचा या अनुषगानं सेटिंग केली तर ३० मिनिटं वापर झाल्यावर अॅप सुरू होणार नाही. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्ही प्रत्येक अॅपनुसार वेळ निश्चित करून ठेवू शकता.
या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.actiondash.playstore

 

Exit mobile version