कोविड १९ अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुरार वर्गोन्नती देत असताना मार्गदर्शक सूचना…
कोविड १९ च्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये इ. १ ली ते ४ थी च्या शाळा सुरू करता आल्या नाहीत व इ. ५ वी ते ८ वी च्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्गाध्यापन शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन, शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दिक्षा ॲप (DIKSHA) आधारित “शाळा बंद…..पण शिक्षण आहे” या अभ्यासमालेच्या सहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिकणे सुरू राहावे म्हणून प्रयत्न केले गेले. त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचसोबत गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा अशा शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण दूरदर्शनच्या डी.डी सह्याद्री मराठी वाहिनीवरून सुरू आहे.
तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेच. राज्यातील शिक्षकांनी या परिस्थितीत देखील ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात तसेच वाड्या वस्त्यांवर, तांड्यांवर प्रत्यक्ष जाऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण सुरू ठेवले आहे. उपरोक्त परिपत्रकांन्वये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेबाबत कळविण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर देखील स्थानिक स्वराज्य संस्थानी आपापल्या परीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिक्षकांनी इ.१ ली ते ४ थी च्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून येत आहे. याचसोबत इ.५ वी ते ८ वीं च्या शाळा राज्यात सुरु केल्या गेल्या आहेत. बहुतांश शाळांमध्ये इ. १ ली ते ८ वी व्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केले गेले आहे व काही शाळांमध्ये संकलित मूल्यमापन देखील केले गेले आहे.
उपरोक्त बाबींचा विचार करून इ.१ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १६ अन्वये वर्गोन्नती देण्यास मान्यता दिली आहे.
सविस्तर माहिती साठी खालील पत्राचे अवलोकन करावे :-