Site icon ज्ञानसंवाद

आदिवासी आश्रमशाळा शिक्षक मदत निधीने दिला आदिवासी कुटुंबाला मदतीचा हात

 

अकोलेे:- नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या दुग॔म आदिवासी भागातील कोंभाळणे गावातील गावापासुन बाहेर वस्ती करुन राहत असलेल्या श्रीम.रख्खमाबाई लक्ष्मण पथवे ,श्री दशरथ उल्लास ऊघडे,श्रीम.चंद्रकला नामदेव मेंगाळ,श्री युवराज आनंदा गावंडे आशा चार आदिवासी कुटुंबाचे घर दिनांक 02/04/2021 रोजी दुपारी 1:00 वाजता आगीच्या भस्यस्थानी पडून राहत्या घराला आग लागली होती.आगीच्या वेळी घरात फक्त दोन महिला व लहान मुले व तीन शेळ्या होत्या. या दोन्ही महिलेच्या घराच्या पच्छिम बाजुने घरापासुन दुरवरुन आग पेटत आहे हे लक्षात आल्याने घरातील या दोन्ही महिलेने आग विझवण्यासाठी धाव घेतली परंतु आग विझवण्यासाठी खुप प्रयत्न करूनही दुपारच्या प्रहरी ऊन ,वारा यामुळे आग विझवणे कठीण झाले होते. काही क्षणातच एका घराला आग लागली त्यामुळे सावधान बाळगत शेजारील घरातील लहान मुलां सह जीव मुठीत घेऊन या दोन्ही महिलेने घरातुन बाहेर पळ काढला परंतु घरातील शेळ्या पेटलेल्या घरातच जळुन गेल्या.घरालाच आग लागल्याने शेळ्यांना बाहेर काढण्यास त्या दोन्ही महिलेंना जमलेच नाही असी दुर्दैवी घटना घडली सुदैवाने मानवी जिवीत हानी झाली नाही. परंतु मुक्या प्राण्यांचा पेटलेल्या आगितच होरपळुन मृत्यु झाल्याने उपस्थितांची मने हळहळली. या चारही कुटंबामध्ये लहान मोठे एकुण 21 सदस्य असुन प्रत्यक्ष घटनेच्या वेळी फक्त 2 महिला व लहान मुले उपस्थित होते .संसारपयोगी साहित्य ‘धान्य, घरात साठवून ठेवलेला किराणा साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता आशा आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या जेवणाचा प्रश्न सर्वात अगोदर सोडवणे गरजेचं होते . घडना घडल्याचे समजताच 24 तासाच्या आत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर चे प्रकल्प अधिकारी मा.श्री संतोष ठुबे यांनी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा शिक्षक कर्मचार्यांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने covid १९ च्या प्रादुर्भावात आदिवासी समाजासाठी उभा केलेल्या मदत निधीतून ह्या कुटुंबाना मदत करण्याचे ठरले. आणि तातडीने प्रकल्पस्तरीय निधी संकलन समितीच्या मार्फत प्रकल्प अधिकारी श्री.संतोष ठुबे यांचे मार्गदर्शन नुसार आदिवासी विकास निरीक्षक श्री गंगाराम करवर’, गृहपाल श्री बडे सी.ए मुलांचे वसतीगृह समशेरपुर ,मुख्याद्यापक श्री बडवे सी.पी. व कर्मचारी श्री भालेराव के.बी,शा.आ.शा केळीरुम्हणवाडी अकोल्याचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कुटुंबांना शिक्षक मदत निधीतून संसारोपयोगी साहित्य व किराणा साहित्य तातडीने दिले. अत्यावश्यक प्रथम मदत मिळाल्यामुळे या चारही कुटुंबाच्या चेहर्यावर
समाधान उजळून आले होते.सदर प्रसंगी वन विभागाचे श्री गोंदके सो. कोंभाळणे गावचे महिला सरपंच शांताबाई पोपेरे, ‘ऊप सरपंच गोविंद सदगीर, पोलिस पाटील सुनंदा बबन बिन्नर, तंटामुक्त अध्यक्ष नारायण नागरे,तलाठी अंकुश खेमनर व ग्रामस्त ऊपस्थीत होते.
कोंभाळणे गावच्या वतिने आपतग्रस्त कुटंब यांचेसाठी गावातुन मदत निधी तसेच धान्य जमा करण्याचे काम सुरु असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शासनातर्फे सदर कुटुंबांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन डाॅ. लहामटे यांनी उपस्थितांना दिले. राजूर प्रकल्पातील निधी संकलनाच्या कार्यात जे जे शिक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत.त्यांच्यामुळे गरजू आदिवासी कुटुंबाला मदत करण्याचे व गरजेच्या वेळी आदिवासी बांधवांपर्यंत वेळेत मदत पोहचवल्याचे समाधान लाभल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.

Exit mobile version