मित्रांनो आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आहे. ज्यावेळी आपला फोन जुना होतो किंवा मार्केटमध्ये एखादा नवीन फोन येतो त्यावेळी आपण तो खरेदी करतो. आपल्याकडील जुना फोन विकून टाकतो किंवा मित्र नातेवाईक यांना देतो.परंतु यामुळे आपला डेटा लिक होण्याची भीती असते. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन विकायचा असेल तर त्याआधी काय काळजी घ्यायला हवी.हे बघूया आजच्या टेक्नो टिप्स मध्ये….
१) गुगल आयडी लॉग आउट करूनच मोबाईल विकायला काढा.कारण, यात तुमचे बँक अकाउंट जोडलेले असते. लॉग आउट करण्याआधी सेटिंग मधील युजर अँड अकाउंट्सच्या ऑप्शनवर जा. त्यानंतर रिमूव्हचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. अकाउंट लॉग आउट होईल.
२) सेटिंगमध्ये जाऊन बॅकअपच्या ऑप्शनवर क्लिक करा. आवश्यक असलेला डाटा बॅकअप करून घ्या.यात तुम्हाला सर्व फोटो, कागदपत्रे, व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर जावून ते सेव्ह करा.
३)स्मार्टफोनचा पासवर्ड बदला.
स्मार्टफोन विकण्याआधी सेव्ह पासवर्ड काढून टाका. तुमचा खासगी डाटा चुकीच्या हातात पडू यासाठी ही काळजी आवश्यक आहे. त्यामुळे ब्राऊजररच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सेव पासवर्डचा पर्याय निवडा.(क्रोम ब्राऊझर मध्ये उजव्या बाजूला तीन डॉट दिसतात)या ठिकाणी प्रत्येक वेबसाइटचा पासवर्ड दिसेल. याचा तुम्ही वापर करू शकता. या पासवर्डला कायमचे काढून टाकण्यासाठी तुम्हाला याच्यापुढे दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रिमूव्हचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर पासवर्ड डिलिट होईल.
४)सोशल मीडियावर किंवा इतर ज्या ज्या अॅप मध्ये लॉगिन आहात ते सर्व लॉग आऊट करून मगच फोन विक्रीला दया.