Site icon ज्ञानसंवाद

टि.ई.टी.उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित न करणेबाबत.

टि.ई.टी. उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या तसेच विहित मुदतीत टि.ई.टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत मा.उच्च न्यायालयात स्टेटस्को आदेश असलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित न करणेबाबत 

 टि.ई.टी उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या तसेच विहित मुदतीत टि.ई.टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत मा.उच्च न्यायालयात स्टेटस्को आदेश असल्यास, अशा शिक्षकांचे वेतन न्यायालयाचा निर्णय अभ्यासून, नेमकी कशास स्थगिती आहे ते पडताळून मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जैसे थे परिस्थिती ठेवावयाची असल्यास, त्यानुसार कार्यवाही करावी. तसेच मा.उच्च न्यायालयाच्या स्टेटस्को आदेशासोबत शिक्षकांची यादीत वेतन मागणी करणा-या शिक्षकांचे नाव पडताळण्याची जबाबदारी अधीक्षक, वेतन व भ.नि. नि पथक (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येत आहे.

या संदर्भात खालील मान्यवरांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता:-   

१)मा.किरण सरनाईक,वि.प.सदस्य
२) श्री शेखर भोयर, संस्थापक अध्यक्ष,शिक्षक महासंघ अमरावती विभाग अमरावती
३) सौ.संगीता एस.शिंदे, अध्यक्षा, शिक्षण संघर्ष संघटना अमरावती 

Exit mobile version