Site icon ज्ञानसंवाद

टेक्नो टिप्स:- मुलांसाठी डिजिटल पाटी (Kidz Slate)

   Kidz Slate

शिक्षक मित्रांनो ‘स्टडी फ्रॉम होम’ व बदलती डिजिटल शैक्षणिक प्रक्रिया बघता मुलांच्या हातात मोबाईल देणे आता अपरिहार्य झाले आहे.मुलांना मोबाईल दिलाच तर मग आता मोबाईल च्या माध्यमातून रंजक पद्धतीने कसे अध्ययन अनुभव देता येईल याचा विचार करायलाच हवा.
आजच्या टेक्नो टिप्स मध्ये पाहणार आहोत आपण ‘मुलांची डिजिटल पाटी’ ‘KIDZ SLATE ‘ हे अॅप प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे.अॅप डाउनलोड करताच आपल्याला त्या मध्ये असणारे विविध रंजक फंक्शन बघायला मिळतील ते आपण क्रमाने बघुयात-

१)FREE HAND DRAWING – यात मुक्त चित्रकला आहे,बोटांच्या साह्याने हवी तशी चित्र काढता येतील व त्यात रंग भरता येतील.

२)TRACING – यात A ते Z पर्यंत मुळाक्षरे आहेत,नर्सरी किंवा पहिलीच्या वर्गात असणाऱ्या मुलांना मुळाक्षरे गिरवण्याचा सराव या द्वारे करता येईल.

 

३)FILL COLOR- यात विविध प्राण्यांची कार्टून चित्रे दिलेली आहेत त्यात रंग भरता येतो.

४)MONTH AND DAYS- यात वारांची नावे व महिन्यांची नावे इंग्रजी स्पेलिंग व ध्वनीसह मिळेल.

५)HUMAN BODY PARTS- यात मानवी शरीराच्या विविध अवयवांची इंग्रजी नावे ध्वनीसह आहेत. अवयवांच्या स्पेलिंग वर क्लिक करताच त्याचा उच्चार ध्वनी ऐकायला येईल.

६)SOLAR SYSTEM- यात सूर्यमालेतील ग्रहांची स्तिथी व ग्रहांची नावे त्यावर क्लिक करताच ऐकायला मिळेल.

७)TABLE- यात १ ते १५ पर्यंतचे पाढे गुणाकार स्वरूपात दिलेले आहेत.हे सुद्धा ऐकायला येतात.

८)GAME- हे फंक्शन सर्वात आवडते आहे.यात बेरीज,वजाबाकी,गुणाकार, व भागाकार यावर खेळातून गणिते सोडवण्यास संगीतले आहे.मुलांचा वयोगट लक्षात घेत त्यात EASY, MEDIUM व HARD आशा तीन प्रकारात उदाहरणे दिलेली आहेत.उत्तर बरोबर येताच कौतुक होते तर चुकले तर अलर्ट बेल वाजून पुन्हा प्रयत्न करण्याची संधी दिली जाते.

आपण कोणत्याही फंक्शन चा वापर करत असताना आपणास मूळ स्थानी परत जाण्यासाठी डाव्या कोपऱ्यात HOME टॅब दिला आहे त्यावर क्लिक करताच आपण अॅप च्या मूळ स्थानी याल.

तर मित्रांनो आशा ‘डिजिटल पाटी ‘ चा मुलांना लाभ देण्यास हरकत नाही.मूल मोबाईल वर इतर अनावश्यक क्रिया करतात त्या पेक्षा या अॅप च्या माध्यमातून त्यांचं शिक्षण रंजक व आनंददायी नक्कीच होईल .

या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.aswdc_kidsslate

 

Exit mobile version