Site icon ज्ञानसंवाद

जिल्हयाच्या स्थानिक प्रशासनाने कोविड-19 च्या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसुचनांचे तंतोतंत पालन करणेबाबत-

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव खुप मोठया प्रमाणावर वाढत आहे. आपल्या प्रकल्पातंर्गत कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा ज्या जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्या संबंधीत जिल्हयाच्या मा. जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी कोरोना साथरोगाचा प्रसार रोखण्यासंबंधीच्या अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत व सदर अधिसुचनांचे तंतोतंत पालन करणे संबंधीत शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा प्रशासनास बंधनकारक आहे.

स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य यांचे निवेदनुसार आदिवासी विकास विभागा अंतर्गत कार्यरत काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधुन शिक्षकांना व शिक्षकेत कर्मचाऱ्यांना संबंधीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे इत्यादी कामे सक्तीने करायला लावत आहेत व त्यामधून कोरोना प्रसार होण्याची भिती आहे असे नमुद केलेले आहे.

तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील अधिनस्त शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा ज्या जिल्हयांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात, त्या जिल्हयांच्या मा. जिल्हाधिकारी यांनी कोविड-19 प्रतिबंध व प्रसार थांबवण्यावाबत देण्यात आलेले निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यासंबंधी आपल्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेतील मुख्यद्यापकांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे. जेणेकरुन शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संपर्कात येणारे विद्यार्थी कोरोना विषाणूमुळे बाधित होणार नाही.

 

Exit mobile version