Site icon ज्ञानसंवाद

सर फाऊंडेशन सोलापूर आयोजित ” विविध गुणदर्शनाची धुळवड” कार्यक्रमात औरंगाबादच्या शिक्षिकांनी सादर केला उत्कृष्ट कलाविष्कार

औरंगाबाद:- ‘सर फाउंडेशन सोलापूर’ आयोजित शिक्षक महोत्सवांतर्गत ‘विविध गुणदर्शनाची धुळवड’ हा अनोखा कार्यक्रम राज्यभरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातील शिक्षकांच्या विविध कलागुणांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी होळी व धुळवडीच्या निमित्ताने हा आगळावेगळा सोहळा दिनांक 29 व 30 मार्च रोजी ऑनलाइन संपन्न झाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद दिला.महानगर ते अतिदुर्गम भाग ,तरुण पिढीतील शिक्षक ते अगदी सेवानिवृत्तीपर्यंत पोहचलेल्या शिक्षकांनी सुद्धा अगदी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांमध्ये गायन, नृत्य, विनोद व वादन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कोल्हापूर येथील शिक्षिका सरिता सुतार यांच्या दिल है छोटासा या बहारदार गीताने झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशाला लाडसावंगी ता.औरंगाबाद येथील शिक्षिका श्रीमती शुभांगी सरोवर व त्यांची छोटीशी कन्या शौर्या यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. तसेच श्रीमती नूतन पवार शिक्षिका जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव ता.कन्नड यांनी बहारदार नृत्य तसेच श्रीमती सुरेखा जैन यांनी वाद्यसंगीत इत्यादी कलाविष्काराचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन सर फाउंडेशन सोलापूरचे जिल्हा समन्वयक व तंत्रस्नेही शिक्षक श्री राज किरण चव्हाण श्रीमती अनघा जागीरदार श्री नवनाथ शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकिरण चव्हाण व अनघा जागीरदार यांनी केले.राज्यभरातील जवळपास 35 हजार प्रेक्षकानी या कार्यक्रमाचा ऑनलाइन आस्वाद घेतला.
सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक श्री सिद्धाराम माशाळे श्री बाळासाहेब वाघ श्रीमती हेमा शिंदे यांनी सर्व सहभागी व सोलापुर टीम यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version