Site icon ज्ञानसंवाद

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2019-20 या सत्रात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तरावर Oline पद्धतीने सहभागी होणेसाठी अवगत करणेबाबत.

सत्र 2019-20 राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड योजना फेब्रुवारी २०२० मध्ये सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे घेण्यात आली होती.सदर स्पर्धेत निवडप्राप्त विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवार्ड स्पर्धा (8th NLEPC), कोविड -19 या महामारीच्या कारणास्तव Online/ Virtual पद्धतीने दिनांक 23 ते 27 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. (निवड पात्र विद्याथ्यांची यादी सदर पत्रासोबत संलग्न करण्यात येत आहे.)

याकरिता खालील सूचना चे अवलोकन करावे.

१. सदर स्पर्धा (NLEPC) दिनांक 23 ते 27 एप्रिल 2021 या कालावधीत संपूर्ण देशात सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात एकाच वेळेस घेण्यात येईल. याविषयी स्वतंत्ररित्या शासनाकडून निर्देश प्राप्त होतीत.

२, तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फक्त निवडप्राप्त विद्यार्थ्यांनी दिनांक 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2021 या कालावधीत आपल्या प्रकल्पाची माहिती, Video, Audio, Photographs इत्यादी सर्व तांत्रिक बाबींची माहिती ‘MANAK Competion App’ या app द्वारे भरावयाची आहे. प्रकल्पाची तथा app ची संपूर्ण माहिती https://www.youtube.comwatch?s=vlleWTYBe8o या YouTube लिंकवर प्राप्त करून दिलेली आहे.

३. ७ वे राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन (7th NLEPC या मध्ये जे विद्यार्थी काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नसतील त्यानाही त्यांचे संमती पत्र घेऊन या स्पर्धेत सहभागी होता येईल.

४. याविषयी काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांना inspirea nifindia.org या मेल वर संदेशवहन करता येईल.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ:-

http://www.inspireawards-dst.gov.in/UserP/children-corner.aspx

निवड विद्यार्थी यादी:-

https://drive.google.com/file/d/16tSR0bt5pPXn2yfdzkEXUY1NR0YK9VVw/view?usp=drivesdk

Exit mobile version