Site icon ज्ञानसंवाद

युट्युबचे मुलांसाठी स्वतंत्र अॅप्लीकेशन

       मुलांसाठी स्वतंत्र युट्यूबचे अॅप्लिकेशन

मित्रांनो सध्या सर्वत्र मुलांना मोबाईल वरून अभ्यास दिला जातो आहे.काळाची पावले व बदलणारे आधुनिक जग बघता शिक्षणात तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अनिवार्य झाले आहे. जे पालक मुलांना मोबाईल हाताळायला देण्यास टाळाटाळ करत होते आज मुलांच्या हातात मोबाईल देणे नाईलाजाने का होईना पण अत्यावश्यक झाले आहे अशीच सर्वत्र परिस्थिती आहे.मुलांना अभ्यासाला मोबाईल दिला तरी मुलं आपलं थोडंस दूर्लक्ष झालं तरी मोबाईल वर युट्युब उघडून वेगवेगळे व्हिडियो बघत असतात.युट्यूब वर सर्व वयोगटातील व असंख्य विषयावर व्हिडिओ उपलब्ध आहेत.यातील काही व्हिडिओ बालमनावर प्रतिकूल परिणाम करणारे पण असतात.यासाठी युट्यूब चे खास मुलांसाठी तयार केलेले अॅप्लिकेशन You tube Kids हे अॅप प्ले स्टोअर वर मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
अॅप डाउनलोड केल्यावर त्यात parent control हे फंक्शन आहे यावरून आपले पाल्य ज्या वयोगटातील आहे तो वयोगट निवडता येतो व तिथे उपलब्ध असलेले विविध श्रेणीतील व्हिडिओ प्रकार यातील कोणता प्रकार हा आपल्या पाल्यास बघायला हवा सुद्धा सेट करता येते. त्यानंतर मुलांना बिनधास्त युट्युब बघू द्या त्यात मुलांच्या ज्ञान व मनोरंजनासाठी प्रचंड प्रमाणात व्हिडिओ उपलब्ध आहेत.
या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.youtube.kids

Exit mobile version