Site icon ज्ञानसंवाद

टेक्नो टिप्स :-१० वी /१२ वी चे मार्कशीट डाउनलोड करणे.

मित्रांनो काही वेळेस आपल्याकडून १० वी /१२ वी चे मार्कशीट हरवले जाते,किंवा अत्यावश्यक वेळी सापडत नाही अशा वेळी होणारा मनःस्ताप हा विचार न केलेला बरा. पण आता चिंता करण्याचे कारण नाही.कारण आपल्याला परीक्षेला बसलेला सीट नंबर व मिळालेले मार्क्स माहीत असतील तर परत ती मार्कशीट pdf स्वरूपात डाउनलोड करता येते.
चला तर मग अजच्या टेक्नो टिप्स मध्ये बघूया १० वी /१२ वी चे मार्कशीट डाउनलोड करणे.सर्व प्रथम गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये ‘eMarksheet’ सर्च करा.त्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे’ अधिकृत संकेतस्थळ उघडेल त्यात डाव्या बाजूला Verify SSC and HSS Mark Sheet मध्ये Create New Account येथे क्लिक करा.तुमच्याकडून verification फॉर्म भरून घेतल्या जाते.त्यातील सर्व माहिती अचूक भरावी.कॅटॅगिरी individual सिलेक्ट करावी.आपला ईमेल आयडी टाकावा हाच आपला या साईट साठी ‘युजर नेम’ असेल.पासवर्ड सेट करताना पहिल अक्षर हे कॅपिटल घ्यावं,दुसरं स्मॉल लेटर त्यानंतर नंबर टाकावे व शेवटी स्पेशल कॅरेक्टर जसे &@# यापैकी कोणतेही एक.एक वेळ सेट केलेला पासवर्ड परत कंफॉर्म साठी तोच टाकावा.व्हेरिफिकेशन कोड मध्ये खाली आलेला कॅप्चा टाकावा.चौकटीत अॅग्री करून रजिस्टर करावे.यानंत otp साठी सोबत असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.otp प्राप्त होताच तो इंटर करून प्रोसिड करावे.आता होम पेज वरून युझर आयडी म्हणजे आपला ईमेल आयडी व आता सेट केलेला पासवर्ड टाकून sign in व्हावे.यानंतर एक नवीन विंडो उघडेल यात वरच्या आडव्या पट्टीत verify १० की १२ वी ज्या इयत्तेचे मार्कशीट काढायचे तिथे क्लिक करावे.यात पासिंग वर्ष,महिना,बैठक क्रमांक,व मिळालेले एकूण गुण व शेवटी कॅप्चा टाकून सबमिट करावे.आपल्या समोर आपला पूर्ण निकाल दिसे.मार्कशीट ची pdf डाउनलोड करण्यासाठी खाली तळाला get pdf वर क्लिक करावे.काही सेकंदा मध्ये आपली मार्कशीट pdf डाऊनलोड होईल.

या सुविधेसाठी लिंक:-

https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/

Exit mobile version