Site icon ज्ञानसंवाद

नाशिक प्रकल्पातील शासकीय/ अनुदानीत आश्रमशाळा व वसतिगृह दिनांक ०५.०४.२०२१पर्यंत बंद ठेवणेबाबत.

नाशिक:-प्रकल्प कार्यालय नाशिकच्या अंतर्गत असलेल्या शासकीय/ अनुदानीत आश्रमशाळा व वसतिगृह विद्यार्थ्यांना दिनांक २७.०३.२०२१ ते २९.०३.२०२१ पर्यंत मा. अपर आयुक्त, नाशिक यांनी दिलेल्या सुटटीच्या यादीप्रमाणे होळी या सना निमीत्त सर्व विद्यार्थ्यांना सुटटी देण्यात आलेली आहे. कोविड-१९ या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ग्रामीण भागात कोवीड १९ च्या वाढता प्रार्दुभाव स्थानिक स्वराज्य संस्थेने स्थानिक पातळीवर शाळा बंदचे निर्देश दिलेले आहेत तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थी पालकांच्या ताब्यात सुरक्षित राहावे या करिता सदर विद्यार्थ्यांना दिनांक ०५.०४.२०२१ पर्यंत शालेय कामकाज बंद ठेवण्यात यावे, विदयार्थ्यांना शाळेत/वसतिगृहात पुढील आदेश येईपर्यंत बोलवण्यात येउ नये. आशा सूचना नाशिक प्रकल्पातील सर्व अदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व गृहपाल यांना प्रकल्प अधिकारी नाशिक यांनी दिले आहेत.

Exit mobile version