टि.ई.टी. उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या तसेच विहित मुदतीत टि.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत मा. उच्च न्यायालयात स्टेटस्को आदेश असलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित न करणेबाबत…
शांताराम देशमुख (नाशिक):-टि.ई. टी. उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या तसेच विहित मुदतीत टि.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत मा. उच्च न्यायालयात स्टेटस्को आदेश असल्यास, अशा शिक्षकांचे वेतन न्यायालयाचा निर्णय अभ्यासून, नेमकी कशास स्थगिती आहे ते पडताळून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जैसे थे परिस्थिती ठेवावयाची असल्यास, त्यानुसार कार्यवाही करावी. तसेच मा. उच्च न्यायालयाच्या स्टेटस्को आदेशासोबत शिक्षकांची यादीत वेतन मागणी करणा-या शिक्षकांचे नांव पडताळण्याची जबाबदारी अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येत आहे.
असे मा. शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी पत्राद्वारे कळविले आहे.