Site icon ज्ञानसंवाद

टंचाईग्रस्त/ दुष्काळग्रस्त आणि अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील १० वी,१२ वी विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना ऑनलाईन माहिती देणेसाठी मुदतवाढ

(प्रशांत जाधव,नाशिक):- २०१७-१८, २०१८-१९. मधील इ १० वी व १२ वीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीस पात्र असलेल्या आणि अद्याप परीक्षा शुल्क अदा ने झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क अदा करणेसाठी तसेच सन २०१९-२०२० मधील अवेळी पावसामुळे ३४ जिल्हयातील ३४९ तालुक्यातील बाधित क्षेत्रातील इ. १० वी आणि इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अनुक्रमे SSC (‘http://feerefund.mh-ssc.ac.in व HSC (http:/feerefund.mh-hsc.ac.in हया लिंकवर उपलब्ध करून दिलेली असुन सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahahsscboard.in यावर प्रसिध्द करून दि. १५/०३/२०२१ पर्यंत मागविण्यात आलेली होती.

परंतु सदर नवीन प्रणालीमध्ये माहिती भरतांना अनेक माध्यमिक शाळा /उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना अडचणी येत आहेत त्यामुळे सदर

नवीन प्रणाली व येणा-या अडचणींचा विचार करून दि. २५/०३/ २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी

Exit mobile version